पनवेल येथील वाल्मिकीनगर मध्ये आरोग्य शिबीराचे आयोजन...
पनवेल / दि.13 : पनवेल महानगरपालिकच्या कार्यक्षेत्रातील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र 2 अंतर्गत वाल्मिकी नगर येथील गणपती मंदिरात मोफत आरेाग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. नगरसेविका डॉ. सुरेखा मोहोकर, मुख्य वैद्यकिय व आरोग्य अधिकारी डॉ. आनंद गोसावी ,आरसीएच अधिकारी डॉ. रेहाना मुजावर यांच्या प्रमुख उपस्थितीत हे शिबीर संपन्न् झाले.
राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत घेण्यात आलेल्या या आरोग्य शिबीरात जनरल तपासणी, लहान मुलांची तपासणी,गरोदर स्त्रियांची तपासणी, किशोरवयीन मुलांमुलींची तपासणी, जेष्ठ नागरिकांची तपासणी, बीएमडी तपासणी, कोविड 19 प्रतिबंधक लसीकरण, रक्त तपासणी करण्यात आली. रूग्णांना औषधेही देण्यात आली. या शिबीरासाठी तेरणा वैद्यकिय महाविद्यालयाचे डॉक्टर्स तसेच चिरायू हॉस्पीटलचे सहकार्य मिळाले.
महापालिकेच्या माध्यमातून सध्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या विविध विभागामध्ये आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात येत आहे. नुकतेच भिंगारी येथील कराडी हॉल,, कळंबोली येथील आई माता मंदिर, खारघर येथील रघूनाथ विहार, नवीन पनवेलमध्ये शंकर मंदिर याठिकाणी आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबीरांसाठी सर्व नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांचे वैद्यकिय अधिकारी , मुख्यालयातील वैद्यकिय अधिकारी, सर्व परिचारिका,वॉर्ड बॉय यांनी परिश्रम घेतले.