अज्ञात लोकलच्या धडकेने इसमाचा मृत्यू...
अज्ञात लोकलच्या धडकेने इसमाचा मृत्यू...

पनवेल , दि. ९  (संजय कदम) ः अज्ञात लोकलची धडक लागून गाडीच्या खाली येवून एका इसमाचा मृत्यू झाला असून त्याच्या नातेवाईकांचा शोध पनवेल रेल्वे पोलीस करीत आहेत.
सदर अनोळखी इसम हा खांदेश्‍वर ते पनवेल रेल्वे कि.मी. नं.46/13 ते 46/14 च्या दरम्यान जात असताना अप अज्ञात लोकलची ठोकर त्याला लागून त्यात तो जखमी होवून मृत्यू पावला आहे. सदर अनोळखी इसम हा मुस्लीम पुरुष असून वय 40 वर्षे, उंची 5 फूट 5 इंच, अंगाने मध्यम, रंग निम गोरा, चेहरा गोल, नाक सरळ, केस काळे, डोळे काळे आहेत. या इसमाबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास पनवेल रेल्वे पोलीस ठाणे दूरध्वनी 022-27467122 किंवा सहा.पोलीस निरीक्षक पी.एम.कांबळे मो.नं. 9870594081 येथे संपर्क साधावा.
Comments