सामाजिक संकटात वाढदिवस साजरा करणार नाही ; वसंत ओसवाल
सामाजिक संकटात वाढदिवस साजरा करणार नाही ;  वसंत ओसवाल

कळंबोली / दीपक घोसाळकर : करोना सारख्या जागतिक महामारी च्या संकटाने सामाजिक , सार्वजनिक जनजीवन अस्तव्यस्त झाले असताना सामाजिक बांधिलकीचे भान जपत व हितचिंतक, पक्षाचे कार्यकर्ते यांच्या प्रेमाचा आदर करून यावर्षी माझा वाढदिवस साजरा न करण्याचे निश्चित केले असल्याने  या वर्षी २५ डिसेंबरला मी पालीत उपलब्ध नसल्याचे माझ्या हितचिंतक पक्षाचे कार्यकर्ते तसेच संस्थेच्या कोणत्याही कर्मचारी वर्गाने पालीत शुभेच्छा देण्यासाठी न येण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते व सुधागड एज्युकेशन सोसायटीचे विद्यमान अध्यक्ष वसंत ओसवाल यांनी आपल्या केले आहे.
      
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून सलग तीन वेळा रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष पदाची धुरा समर्थपणे सांभाळणारे , इतर मागास वर्गीय व वित्त विकास महामंडळाचे अध्यक्ष पद भूषविणारे व रायगड जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात नामांकित असणाऱ्या सुधागड एज्युकेशन सोसायटीचे विद्यमान अध्यक्ष वसंत गणेशमल ओसवाल यांचा दरवर्षी २५ डिसेंबरला वाढदिवस मोठ्या धुमधडाक्यात पक्षाचे कार्यकर्ते ,हितचिंतक व संस्थेचे कर्मचारी वर्ग  पालीमध्ये साजरा करीत असतात. यावर्षी ते ८० व्या वर्षात पदार्पण करीत आहेत.यावेळी जिल्हाभरातून मोठ्या संख्येने पक्षाचे कार्यकर्ते, हितचिंतक हे पालीत येऊन वसंत ओसवाल यांना दीर्घायुष्य व जीवनात आनंद मिळावा यासाठी हार्दिक शुभेच्छा देण्यासाठी येतात. परंतु यावर्षी जागतिक करोणा महामारी च्या संकटाने सर्वच सार्वजनिक, सामाजिक जनजीवन विस्कळीत झाले असल्याने व करोणा महामारी चे संकट समाजावर आले असल्याने या वर्षी  २५ डिसेंबर ला वाढदिवसाचा कार्यक्रम साजरा न करण्याचे वसंत ओसवाल यांनी ठरवले आहे. तसेच वाढदिवसाच्या दिवशी ते पालितील निवासस्थानी उपलब्ध नसल्याने कोणत्याही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हितचिंतकांनी व सुधागड एज्युकेशन सोसायटीच्या कर्मचारी वर्गाने  व प्राचार्यांनी पालीत वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी येऊ नये असे आव्हान त्यांनी केले आहे .पक्षाचे कार्यकर्ते व जिल्ह्यातील विविध अन्य पक्षांच्या कार्यकर्त्यांचे मिळत असलेले भरभरून प्रेम हेच माझ्या आनंदी जीवनाचे गमक असल्याने आपल्या आनंददायी व प्रेरणा देणाऱ्या शुभेच्छा मनाला आनंदी राहण्यासाठी उर्ज्या देत असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
Comments