क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचा स्मृतिदिन साजरा....
क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचा स्मृतिदिन साजरा....
देशातील बहुजन समाजाला शिक्षणाची प्रेरणा देणारे क्रांतिसूर्य महात्मा फुले यांचा स्मृतिदिन महाराष्ट्र शासन आदिवासी विभाग शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा चिंबीपाडा तालुका भिवंडी जिल्हा ठाणे येथे आदिवासी  विद्यार्थी विध्यार्थीनी 28 नोव्हेंबर रोजी महात्मा फुले यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.

यावेळी  अधीक्षक  महादेव  भंडारी  पुष्पहार अर्पण करून यांनी त्याकाळी दलित, लोकांवर होणारा अन्याय विरोध करून , महिला सक्षमीकरण, आणि शिक्षण महत्त्व कसे आहे, याबाबत महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनप्रवास विषयक विद्यार्थीना मार्गदर्शन केले, तसेच स्त्री अधिक्षिका  माधुरी लोखंडे महात्मा फुले यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांनी प्रथम शिक्षण घेऊन आपल्याला या ठिकाणी घेऊन आलेत, आपण त्यांचे ऋणी आहोत,  त्यांची प्रेरणा घेतली पाहिजे,  तर महिला, मुली शिक्षण घेऊन सक्षम झाले पाहिजे, आणि त्याकरिता प्रथम महात्मा फुले यांचे स्मरण असावे, असे विद्यार्थीनीना मार्गदर्शन केले, 
यावेळी कर्मचारी दिगंबर गाडे, आणि विद्यार्थीनी उपस्थित होते.
Comments