खांदा वसाहत परिसरातील सोसायटी मधील नागरिकांसाठी शिवसेनेचा मदतीचा हात...
खांदा वसाहत परिसरातील सोसायटी मधील नागरिकांसाठी शिवसेनेचा मदतीचा हात...
पनवेल, दि. 3 (संजय कदम) ः खांदा वसाहत परिसरात असलेल्या सर्व सोसायटीमधील नागरिकांना असणार्‍या समस्या तसेच इतर तक्रारींसंदर्भात खांदा वसाहत शिवसेनेतर्फे मदतीचा हात म्हणून सोशल मिडीया माध्यमाचा वापर करण्यात येणार आहे.
खांदा वसाहत शहरप्रमुख सदानंद शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली या भागातील सर्व सोसायटी मधील नागरिकांना काही समस्या किंवा तक्रारी असल्यास त्यांनी सोशल मिडीयाच्या माध्यमाद्वारे भ्रमणध्वनी 9082200618 या क्रमांकावर आपली तक्रार लिहून व्हॉटस्अप करावी. त्यामध्ये प्रामुख्याने कोरोना संदर्भातील अडचणी, हॉस्पिटलमध्ये बेड मिळत नसेल तर त्या संदर्भात, रुग्णालयातील वाढीव बिला संदर्भात, रुग्ण वाहिका सेवेसंदर्भात, घरी क्वारंटाईन असल्यास मदत हवी असल्या संदर्भात, सोसायटी अथवा परिसर मोफत निर्जुतुणीकरण फवारणी करण्यासाठी या समस्यांसह रस्ता, पाणी, विजेच्या समस्या ड्रेनेज, कचरा वाहतूक, उद्यान, वृक्ष कटींग, पावसाळी लाईन, अतिक्रमण, वैद्यकीय शिक्षण, महिला बचत गट, महानगरपालिका संदर्भातील तक्रारी, राज्य शासनाकडील विषय, केंद्र शासनाकडील विषय, लसीकरण, पोलीस व इतर तक्रारी करू शकतात. सदर सेवा ही 24 तास व आठवड्यातील सात ही दिवस सुरू राहणार असल्याची माहिती शहरप्रमुख सदानंद शिर्के यांनी दिली.


फोटो ः शिवसेनेची मोफत सेवा
Comments