हर्षला तांबोळी व नारायण तांबोळी चॅरीटेबल ट्रस्ट पनवेलतर्फे महिलांमध्ये सॅनिटरी नॅपकीनची जनजागृती व वाटप....
हर्षला तांबोळी व नारायण तांबोळी चॅरीटेबल ट्रस्ट पनवेलतर्फे महिलांमध्ये सॅनिटरी नॅपकीनची जनजागृती व वाटप....
पनवेल /प्रतिनिधी  : अंदाड गावात तसेच पनवेल-तक्का आदिवासी ग्रामीण विभागात हर्षला तांबोळी आणि नारायण लक्ष्मण तांबोळी चॅरीटेबल ट्रस्ट, पनवेल अंतर्गत सॅनिटरी नॅपकीनची जनजागृती करण्यासाठी जिल्हा परिषद शाळा अंदाड या ठिकाणी हळदी कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महिलाना सॅनिटरी नॅपकीनचे वाटप करण्यात आले. पनवेलच्या हर्षला तांबोळी यांच्यासोबत विजया चौधरी, विशाखा कापडी, गौरी जगे, तन्वी तांबोळी, सुमन आणि संजय बोराडे हे उपस्थित होते.

            पनवेल तालुक्यात राहणाऱ्या हर्षला तांबोळी आणि नारायण लक्ष्मण तांबोळी चॅरीटेबल ट्रस्ट यांच्यातर्फे कोरोनाच्या काळात अनेक गोर -गरीब नागरिक आणि रस्त्यावरील फिरस्ते याना मदत करण्यात आली. हर्षला तांबोळी यानी महिलांमध्ये सॅनिटरी नॅपकीनची जनजागृती करण्याचे ठरवले आहे. यासाठी त्या मेहनत घेत आहेत. वयात येणाऱ्या प्रत्येक मुलीला मासिक पाळी येतेच. प्रजननासाठी मासिक पाळी अत्यावश्यक असते. होणारा रक्तस्त्राव आणि त्यामुळे डाग पडू नयेत यासाठी काळजी घेणं गरजेचं असते. मासिक पाळीच्या दिवसांमध्ये पॅड्स वापरणं हा पर्याय असतो. कारण पॅड्स वापरायला सोपे आणि सुरक्षित असतात. मासिक पाळी आल्यानंतर सुरुवातीला पॅड्स वापरणं कधीही उत्तम असते. मासिक पाळीच्या दिवसांमध्ये पॅड्स वापरणं हा पर्याय असतो. पॅड्स वापरायला सोपे आणि सुरक्षित असतात. सॅनिटरी नॅपकिन वापराला १८८० नंतर सुरुवात झाल्याचा उल्लेख आढळतो. हे नॅपकिन्स अस्तित्वात येऊन सुमारे सव्वाशे वर्षे झाली असली तरी अजूनही भारतात ते सर्व स्तरांपर्यंत पोहोचू शकलेले नाहीत.

             सॅनिटरी नॅपकीन, टॅम्पून्स, कप्स ही कोणत्याही ऐशोआरामाची गोष्ट नाही. मासिक पाळीच्या दिवसांमध्येही दिवसभर बाहेर राहून काम करणे किंवा शाळा-कॉलेजात जाणे यासाठी कापड फारसे सोयीस्कर नाही. कापड त्वचेसाठी चांगले असले तरी नोकरी करणाऱ्यांसाठी किंवा शाळा-कॉलेजच्या निमित्ताने दिवसभर बाहेर राहणाऱ्यांसाठी सॅनिटरी नॅपकीन, टॅम्पोन्स, कप्स या गोष्टी सोयीस्कर ठरतात. अंदाड गावात तसेच पनवेल-तक्का आदिवासी ग्रामीण विभागात हर्षला तांबोळी आणि नारायण लक्ष्मण तांबोळी चॅरीटेबल ट्रस्ट, पनवेल अंतर्गत सॅनिटरी नॅपकीनची जनजागृती करण्यासाठी महिलाना सॅनिटरी नॅपकीनचे वाटप करण्यात आले.
Comments