२ लाख ७० हजार रुपये किंमतीच्या सहा टायरसह डिस्कची चोरी...
२ लाख ७० हजार रुपये किंमतीच्या सहा टायरसह डिस्कची चोरी...

पनवेल, दि. २९ (संजय कदम) ः अज्ञात चोरट्याने 2 लाख 70 हजार रुपये किंमतीच्या सहा टायर्ससह डिस्कची चोरी केल्याची घटना पनवेल जवळील कोळखे गाव येथील एका गॅरेजमध्ये घडली आहे.
मनोज पासवान (48) यांचे सुनील मोटार्स गॅरेज असून त्या ठिकाणी 14 टायर असलेली टाटा टोरस मॉडेल या नवीन गाडीची बॉडी बनविण्याकरिता ठेवली होती. सदर गाडीचे पाठीमागील 6 टायर डिस्कसह अज्ञात चोरट्याने चोरुन नेल्याने याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
Comments