इनरव्हील क्लब ऑफ पनवेल तर्फे ज्येष्ठ नागरिकांसाठी संधिवातावर उपयुक्त योगाभ्यास कार्यशाळेचे यशस्वी आयोजन....
इनरव्हील क्लब ऑफ पनवेल तर्फे ज्येष्ठ नागरिकांसाठी संधिवातावर उपयुक्त योगाभ्यास कार्यशाळेचे यशस्वी आयोजन....

पनवेल, दि.25 (संजय कदम) ः  ज्येष्ठ नागरीक संघाच्या सभागृहात ज्येष्ठ नागरीकांसाठी संधिवातावर उपयुक्त ठरणार्‍या योगाभ्यासाची 1 तासाची कार्यशाळा इनरव्हील क्लब ऑफ पनवेलने घेतली. या कार्यशाळेत उपस्थित सदस्यांकडून खुर्चीत बसून सर्व आसने करून घेण्यात आली. सर्व सदस्यांनी फारच उत्साहाने यात सहभाग घेतला व 1 तास व्यायामाचा मजेत घालवला.
योग सजा नाही तर मजा आहे हे पटवून देण्यात या कार्यशाळेचा नक्कीच उपयोग होईल असा इनरव्हीलला विश्‍वास वाटतो. या कार्यशाळेत एकूण 150 ज्येष्ठ नागरिकांनी आणि 20 इनरव्हील सदस्यांनी उपस्थिती लावली व त्याचा लाभ घेतला. इनरव्हीलकडून यावेळी शिकविल्या गेलेल्या आसनांच्या पुस्तिकांचे वाटपही ज्येष्ठांना करण्यात आले. का कार्यक्रम यशस्वी होण्यात ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष श्री. जोशी आणि उपाध्यक्षा सौ. शामल आंग्रे यांची उपस्थिती महत्त्वाची ठरली. इनरव्हील सदस्या ज्योत्स्ना जोशी, माला दोशी, अलका वैशंपायन, प्रभा सहस्रबुद्धे, शैलजा खाडिलकर आणि योगशिक्षिका गौरी अत्रे यांनी या कार्यक्रमासाठी विशेष मेहनत घेतली. त्याचप्रमाणे प्रेसिडेंट सुलभा निंबाळकर व सेक्रेटरी श्‍वेता वारिंगे यांनी मोलाचे सहकार्य केले.


Comments