खेरणे ग्रामपंचायत तर्फे ग्रामस्थांना फराळाचे वाटप ....
खेरणे ग्रामपंचायत तर्फे ग्रामस्थांना फराळाचे वाटप ...
पनवेल/ प्रतिनिधी: दिवाळी निमित्त पनवेल तालुक्यातील खेरणे गावात तीनशे कुटुंबाला खेरणेचे  माजी सरपंच सोनाली माळी,  माजी उपसरपंच आणि मनसेचे तालुका उपाध्यक्ष कैलास माळी,  सरपंच रेश्मा गोंधळी,  माजी सरपंच मिनाक्षी तांबडे , राजेश गोंधळी, सुरेखा गोधळी, बारकू पाटील, प्रल्हाद म्हात्रे या सदस्यांनी स्वखर्चाने घरोघरी जाऊन रवा, मैदा, साखर, सोनपापडी, सुगंधी उटणे याचे वाटप केले ग्रामपंचायत सदस्यांनी केलेल्या या दिवाळी भेटीने गरीब कुटुंबाला चांगलाच आधार मिळाला. कोरोनाच्या महामारीत अनेकांचे रोजगार गेल्याने दिवाळी साजरी करता येईल की नाही असा प्रश्न पडला होता. पण सदस्यांनी केलेल्या या सामाजिक उपक्रमामुळे दिवाळी आनंदात साजरी करता आली असे ग्रामस्थ सांगत होते, तर प्रत्येकाला आपले सण आनंदाने साजरे करता यावेत यासाठी आम्ही नेहमी प्रयत्नशील असतो एकमेकांच्या सुख-दुःख एकत्र आल्यावरच गावाची एकी टिकून राहते असे सरपंच आणि उपसरपंच यांनी बोलताना सांगितले.
Comments