सुरक्षा रक्षकाने केला दागिन्यांसह रोख रक्कमेचा अपहार....
सुरक्षा रक्षकाने केला दागिन्यांसह रोख रक्कमेचा अपहार....

पनवेल,  दि. 27  (संजय कदम) ः एका सुरक्षा रक्षकानेच बंद घरातील रोख रक्कम व दागिने असा जवळपास 2 लाख 32 हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरुन नेल्याची घटना खारघर वसाहतीमध्ये घडली आहे.
खारघर वसाहतीमधील सेक्टर 21 येथील ग्रामविकास भवन जवळ असलेल्या बन्सल हाऊसमधील सदस्य कुलविंदरसिंग बन्सल व इतर कुटुंबिय घराबाहेर कार्यक्रमानिमित्त गेले असताना त्यावेळी सुरक्षा रक्षकाने घरातील रोख रक्कम व दागिने असा जवळपास 2 लाख 32 हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरुन नेल्याने याबाबतची तक्रार खारघर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
Comments