पोलीस अधिकाऱ्याचे बनावट ओळखपत्र बाळगणाऱ्या व कारवर बनावट नंबर प्लेट लावणारा वकील जेरबंद ....
पोलीस अधिकाऱ्याचे बनावट ओळखपत्र बाळगणाऱ्या व कारवर बनावट नंबर प्लेट लावणारा वकील जेरबंद ....

वाहतूक पोलिसांच्या सजगतेमुळे बनावटगीरी करणारा वकिल अटकेत  

पनवेल, दि.29 (वार्ताहर) ः पोलीस अधिकारी असल्याचे बनावट ओळखपत्र बाळगणाऱया व आपल्या कारवर दुसऱया वाहनाचा नंबर फ्लेट लावून वावरणाऱया एका वकिलाला सीबीडी वाहतुक पोलिसांनी सीबीडी सेक्टर-15 भागात पकडले. दिपक वसंत चुरी असे या वकिलाचे नाव असून सीबीडी पोलिसांनी त्याला बनावटगीरी व फसवणुक केल्याप्रकरणी अटक केली आहे. अधिक चौकशीत त्याने टोल चुकविण्यासाठी व कारवर बँकेकडून जफ्तीची कारवाई होऊ नये यासाठी त्याच्यावर दुसऱया कारचा नंबर फ्लेट लावल्याचे उघडकिस आले आहे.  
सीबीडी सेक्टर-15 भागात नो पार्किंग परिसरामध्ये बेशिस्तपणे वाहन पार्किंग करणाऱया वाहन चालकाविरोधात सीबीडी वाहतुक पोलिसांकडून विशेष मोहीमेद्वारे कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे. या कारवाईदरम्यान गत 25 नोव्हेंबर रोजी सायंकाळी सीबीडी सेक्टर-15 मधील एचडीएफसी बँकेसमोरील रस्त्यावर एक पांढर्‍या रंगाची ह्युंडाई क्रेटा कार वाहतुकीला अडथळा होईल अशा पद्धतीने पार्क असल्याचे आढळुन आले. तसेच सदर कारवर महाराष्ट्र पोलिसांचा लोबो व पोलीस असे लिहीलेली पाटी देखील आढळुन आली. त्यामुळे वाहतुक पोलीस सचिन भापकर यांनी चलान मशीनद्वारे सदर कारच्या नंबरची तपासणी केली असता, सदर कारवर असलेली नंबर फ्लेट ही मारुती सुझुकी वॅगनार या कारची असल्याचे आढळुन आले.  त्यामुळे वाहतुक पोलिसांनी सदर कारवरील नंबर फ्लॅटवर आरटीओ नोंदणीकृत क्रमांकाच्या मालकाला संपर्क साधुन त्याच्याकडे विचारणा केली असता, सदरचा नंबर त्याच्या वॅगनार या कारचा असल्याचे व सदरची कार त्याच्या जवळ असल्याचे व त्याने सदरची कार कुणालाही विक्री केली नसल्याची माहिती दिली. त्यामुळे सदरची क्रेटा कार ही चोरीची असल्याचा संशय निर्माण झाल्याने पोलिसांनी सदर कारच्या मालकाची वाट  पाहिली असता, काही वेळातच कारचा मालक दिपक वसंत चुरी हा त्याठिकाणी एका महिलेसोबत आला. यावेळी वाहतुक पोलिसांनी त्याच्याकडे विचारपुस केली असता, त्याने वाहतुक पोलिसाला दमात घेत, कुलाबा पोलीस ठाण्यात तो पोलीस इन्सपेक्टर असल्याचे बजावले. त्यामुळे वाहतुक पोलिसांनी त्याच्याकडे ओळखपत्राची मागणी केली असता, त्याने राजकुमार गायकवाड या नावाचे पोलिस इन्स्पेक्टर ओळखपत्र दाखवले.  यावेळी त्याठिकाणी दाखल झालेले सीबीडी वाहतुक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगदिश शेलकर यांनी त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता, त्याच्याजवळ दिपक वसंत चुरी या नावाचे बार कौन्सील ऑफ महाराष्ट्र ऍन्ड गोवा हायकोर्ट बॉम्बेचे ओळखपत्र देखील आढळुन आले. त्यानंतर तो बनावट पोलीस अधिकारी असल्याची खात्री पटल्यानंतर पोलीस निरीक्षक शेलकर यांनी त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता, तो मुंबई हायकोर्टात वकिल असल्याचे व टोल नाक्या वरील टोल चुकविण्यासाठी त्याने पोलीस अधिकाऱयाचे बनावट ओळखपत्र बनवून घेतल्याचे कबुल केले. तसेच क्रेटा कार च्या कर्जाचे हफ्ते थकल्याने बँकेकडून सदर कार जप्त करण्यात येऊ नये यासाठी सदर कारवर दुसऱया कारच्या नंबर फ्लेट चा वापर केल्याचेही त्याने कबुल केले. त्यानंतर वाहतुक पोलिसांनी त्याला सीबीडी पोलिसांच्या ताब्यात दिल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
Comments