पनवेलमध्ये भव्यदिव्य उद्योजक सत्कार सोहळा संपन्न, मराठा उद्योजक सारथीतर्फे यशस्वी आयोजन ....
पनवेलमध्ये भव्यदिव्य उद्योजक सत्कार सोहळा संपन्न, मराठा उद्योजक सारथीतर्फे यशस्वी आयोजन ....
पनवेल, दि. ३० (वार्ताहर) : मराठा उद्योजक सारथी या संस्थेने मराठा उद्योजक सत्कार सोहळ्याचे आयोजन संस्मरण डायनिंग अँड बँक्वेट्स हॉल, खांदा कॉलनी,पनवेल येथे केले होते.
कार्यक्रमास पनवेल महानगरपालिकेचे उपायुक्त विठ्ठल डाके, सहायक आयुक्त राजेश बदर, विख्यात उद्योजक मारुती पवार, कझ गॅसचे ढोबळे आदी मान्यवर उपस्थित होते. 
प्रास्ताविक करताना महेश चव्हाण यांनी संस्थेची ध्येय खालीलप्रमाणे विषद केली. पैशाचे व्यवस्थापन 2025 पर्यंत 10,000 परिवार उद्योग, आर्थिक, मानसिक व सामाजिक क्षेत्रात सक्षम करणे.  आगामी काळात उद्योजक उऋज कार्यशाळेचे आयोजन सोशल मिडिया मार्केटिंग, गुगल रेटींगबाबत माहिती उद्योगातील विक्री व्यवस्थापन  तरुण उद्योजकांना मार्गदर्शन  होतकरु तरुण-तरुणींना मार्गदर्शन  परिवाराचे आर्थिक नियोजन इ. राजेश बदर म्हणाले की, दिखता है, वो बिकता है, व्यवसायाचे सादरीकरण महत्त्वाचे आहे. उद्योगामध्ये प्रत्येक संधीचा फायदा घ्या, असे त्यांनी उपस्थित उद्योजकांना आवाहन केले.
पनवेल महानगरपालिका क्षेत्रामधील मराठा व्यवसायिकांनी महानगरपालिकेचे अ‍ॅप डाऊनलोड करून व्यवसाय वृद्धीचा लाभ घेण्याचे आवाहन विठ्ठल डाके यांनी उपस्थितांना केले. विख्यात उद्योजक मारुती पवार यांनी - म्हणजे अ‍ॅटिट्युड व न म्हणजे   तुमच्या उद्योगाला न सुरक्षा द्या,असे नमुद करून उद्योजकांची चे महत्त्व सांगितले. उद्योगामध्ये वन मॅन शो जास्त काळ चालू शकत नसल्याने कामाच्या नियोजनात सहकार्‍यांना सोबत घेणे,असा त्यांनी उद्योजकांना मोलाचा सल्ला दिला. दि नॅशनल को-ऑप. बँकेचे सहायक महाव्यवस्थापक बाळासाहेब पवार यांनी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या कर्जासंबंधीत मराठा उद्योजकांसाठी असलेल्या विविध योजनांची माहिती दिली. तसेच त्यांनी आजमितीस 350 पेक्षा जास्त मराठा उद्योजकांना उपरोक्त महामंडळाचे कर्ज त्यांच्या बँकेमार्फत उपलब्ध करुन दिल्याचे  आवर्जून सांगितले. महामंडळाचे कर्ज मिळण्यासाठी उद्योजकांना आधार कार्ड, पॅनकार्ड, हिंदु मराठा लिहिलेला शाळा सोडल्याचा दाखला, एक पानी प्रोजेक्ट रिपोर्ट व महामंडळाचे लोन सँक्शन लेटर मिळाल्यावर बँकेत तारण ठेवल्यावर बँक कर्ज देते. उपरोक्त संस्थेमार्फत नुकतेच दोन दिवसीय  कार्यशाळेचे आयोजन केले होते. त्यामधील तुकाराम सुर्यवंशी ,नारायण चव्हाण,अवधूत देशमुख ,प्रदीप पडुळे ,सचिन पवार, शरद शिंदे , रवींद्र सावंत आणि दत्तात्रेय जाधव, रामदास शेवाळे या उद्योजकांचा पुष्पगुच्छ व सन्मानपत्र  देऊन सत्कार करण्यात आला. महिला उद्योजक राजश्री कदम ,विजया मोहिते ,कांचन साबळे ,स्वाती जाधव आणि माधवी सावंत यांनाही पुष्पगुच्छ व सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. नव उद्योजक कल्पेश गायकर ,अमित लेकुरवाळे,शशिकांत जाधव,अमोल पवार ,राम निकम,प्रज्योत जावके आणि अवधूत शेळके यांचाही यथोचित गौरव करण्यात आला. तसेच पनवेलमधील ख्यातनाम उद्योजक बबन बाबर ,राम जाधव,दत्तात्रय मुळे,अतुल सावंत ,शिवाजी कदम ,देवराम हाडवळे ,विजय घोडके ,विक्रम घोरपडे ,माऊली तांगडे आणि राजू नलावडे आदी मान्यवरांचाही सत्कार करण्यात आला. सामाजिक क्षेत्रात कार्य करणारे सभासद बाळासाहेब पवार (नॅशनल बँक) ,दशरथ पाटील,राजेश बदर ,विजय चव्हाण ,गौरव जागी,सदानंद शिर्के, स्वप्नील काटकर, दशरथ पाटील, आणि विष्णू साळुंखे यांचाही सत्कार करण्यात आला. 
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण भोसले यांनी केले व उपस्थितांचे आभार अनुराज लेकुरवाळे यांनी मानले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मराठा उद्योजक सारथी टीम, महेश चव्हाण, किरण भोसले,अनुराज लेकुरवाळे, शिवाजी देशमुख, सुशांत चव्हाण व शिवाजी कदम आदींनी अथक परिश्रम घेतले कार्यक्रमाचे निटनेटके आयोजन, वेळेचे नियोजन, उद्योजकांनी दिलेला प्रचंढ प्रतिसाद यामुळे पनवेल, नवी मुंबई परिसरात मराठा उद्योजक सारथीचा एक वेगळाच ठसा उमटल्याचे दिसून आले.


फोटो ः उपस्थित मान्यवरांचा सत्कार करताना आयोजक
Comments
Popular posts
पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीवर महाविकास आघाडीचा झेंडा ; सभापतीपदी नारायणशेठ घरत तर उपसभापतीपदी सुनील सोनावळे यांची बिनविरोध निवड....
Image
पनवेल एजुकेशन सोसायटी संचालित याकुब बेग हायस्कूल व जुनियर कॉलेज व पी.ई.एस इंग्लिश जुनियर कॉलेजचे बारावी परीक्षेत दिमाखदार यश..
Image
पोलीसकन्या श्रुती सुभाष कोकाटे हिचे केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) परीक्षेत सुयश..
Image
हार्ट अटॅक प्रसंगी उपयुक्त ठरणाऱ्या AED मशिन चे रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल व न्यू पनवेल च्या मार्फत लोकार्पण.....
Image
आगामी काळात उद्धव ठाकरेंना जनता उत्स्फूर्त पाठिंबा देईल - शेकाप राज्य सरचिटणीस आ.भाई जयंत पाटील
Image