शिवसेनेमुळे सिडको विभागात काम करणार्‍या ५१२ सुरक्षा रक्षकांना मिळाला न्याय....
शिवसेनेमुळे सिडको विभागात काम करणार्‍या ५१२ सुरक्षा रक्षकांना मिळाला न्याय....

पनवेल,  दि. 26 (संजय कदम) ः गेली 24 वर्षे सिडको विभागात पनवेल व उरण परिसरात सुरक्षा रक्षक म्हणून काम करणार्‍या 512 जणांना शिवसेनेमुळे न्याय मिळाला आहे. या कामगारांना सिडकोने कामावरुन कमी करण्याचा घाट घातला होता. परंतु शिवसेनेच्या दणक्यानंतर त्यांना पूर्ववत कामावर ठेवण्यात आले आहे. तसेच त्यांना थकीत बाकी सुद्धा या महिन्यात देण्यात आली आहे.
पनवेल तालुक्यासह उरण तालुक्यात सिडकोच्या विविध ठिकाणी 512 सुरक्षा रक्षक कामावर होते. परंतु सिडकोने सदर कामगारांना कमी करण्याचा घाट घातला होता. याबाबत या कामगारांनी शिवसेना खारघर शहरप्रमुख शंकर ठाकूर व नवीन पनवेल उपशहरप्रमुख ज्ञानेश्‍वर भंडारी यांची भेट घेवून त्यांना आपल्यावर होत असलेल्या अन्यायाची माहिती दिली. त्यांनी तातडीने शिवसेना रायगड जिल्हा सल्लागार व दि.बा.पाटील प्रकल्पग्रस्त समितीचे अध्यक्ष बबनदादा पाटील यांची भेट घालून दिली. मराठी माणसावर अन्याय होत असल्याचे समजताच बबन पाटील यांनी तात्काळ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी पत्रव्यवहार करून तसेच त्यांची प्रत्यक्ष भेट घेवून प्रकल्पग्रस्त कामगारांवर होत असलेल्या अन्यायाची माहिती दिली व कोणत्याही परिस्थितीत त्यांना कामावरुन कमी केले जावू नये अशी विनंती केली. याची दखल शासनाने घेवून सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ.संजय मुखर्जी यांना या संदर्भात आवश्यक त्या सूचना केल्याने सदर कामगारांना कामावरुन कमी करण्याचे थांबविण्यात आले आहे. त्याचप्रमाणे या कामगारांना आतापर्यंत न दिलेली थकीत बाकी जवळपास लाखाच्या पुढे असलेली रक्कम त्यांना या महिन्यात सुद्धा देण्यात आली आहे. याबद्दल कामगारांनी आनंद व्यक्त करून त्यांनी रोडपाली येथे जिल्हा सल्लागार बबन पाटील, शंकर ठाकूर, ज्ञानेश्‍वर भंडारी यांची भेट घेतली. यावेळी जगदीश ठाकूर, सुदाम पाटील, काशिनाथ पाटील, महादेव पाटील यांच्या उपस्थितीत या पदाधिकार्‍यांचा विशेष सत्कार करण्यात आला व आभार मानण्यात आले.

फोटो ः कामगारांच्या वतीने करण्यात आलेला जिल्हा सल्लागार बबन पाटील व सहकार्‍यांचा सत्कार.
Comments