मोटार सायकल चोरणार्‍या सराईत गुन्हेगारास अटक ; तीन मोटार सायकल केल्या हस्तगत...
मोटार सायकल चोरणार्‍या सराईत गुन्हेगारास अटक ; तीन मोटार सायकल केल्या हस्तगत...

पनवेल, दि. 23  (संजय कदम) ः पनवेल परिसरात उभ्या करून ठेवलेल्या मोटार सायकली चोरणार्‍या एका सराईत चोरट्यास पनवेल शहर पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्याकडून आतापर्यंत तीन मोटार सायकल हस्तगत केल्या आहेत.
गेल्या काही दिवसापासून पनवेल परिसरात दुचाकी वाहने चोरण्याचे प्रमाण वाढले होते. या संदर्भात पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वपोनि अजयकुमार लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सपोनि गणेश दळवी, पो.हवा.गंथडे, पो.हवा.वाघमारे, पो.ना.महेश पाटील, पो.ना.अशोक राठोड, पो.ना.भगवान साळुंखे, पो.शि.राजू खेडकर आदींचे पथक वेगवेगळ्या ठिकाणी शोध घेत असताना पो.ना.अशोक राठोड यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की या गुन्ह्यातील आरोपी मलिक शेख (रा.पेठ गाव) याचा या गुन्ह्यात सहभाग आहे. त्यानुसार त्याला सापळा रचून अटक केली असता त्याने पनवेल विश्रामगृहाजवळ उभी करून ठेवलेली होंडा अ‍ॅक्टीव्हा 5 जी स्कूटर ही चोरल्याचे कबुल केले. त्याचप्रमाणे होंडा कंपनीची अ‍ॅक्टीव्हा व बजाज कंपनीची पल्सर अशी तीन वाहने पनवेल परिसरातून चोरल्याचे कबूल करून त्याची किंमत जवळपास 1 लाख 45 हजार रुपये इतकी आहे. याच्या अटकेमुळे पनवेल परिसरातील अनेक वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
Comments