प्राचार्य भगवान माळी राज्य पुरस्काराने सन्मानित...
प्राचार्य भगवान माळी राज्य पुरस्काराने सन्मानित...

कळंबोली :  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळ यांच्या ' हिरक महोत्सवी राज्यस्तरीय शैक्षणिक अधिवेशन जुन्नर तालुक्यातील ओझर या ठिकाणी संपन्न झाले . राज्यस्तरीय अधिवेशनात सुधागड एज्युकेशन शिक्षण संस्थेच्या नवीन पनवेल येथील बांठीया माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य भगवान शिवकाल माळी यांना राज्यस्तरीय गुणवंत मुख्याध्यापक  या पुरस्काराणे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या हस्ते शाल श्रीफळ स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सम्मानित करण्यात आले. भगवान माळी यांचे रायगड मधील शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक राजकीय सार्वजनिक क्षेत्रातून अभिनंदन केले जात आहे.
         गेल्या २८  वर्षे मुख्याध्यापक पद सांभाळून शैक्षणिक क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून विद्यार्थ्यांपर्यंत ज्ञानदानाचे काम मोठ्या हीरीरीने करीत आहेत. मनमिळावू , कामस प्रवृत्तीचे माळी सर यांचे शैक्षणिक कार्य वाखाणण्याजोगे आहे . विद्यार्थी पालक शिक्षक शाळा संस्था यांचा कमालीचा समतोल साधत या सर्व घटकांच्या प्रगतीत त्यांचा मोलाचा वाटा आहे . नवनवीन शैक्षणिक तंत्राचा प्रणाली चा वापर करून शैक्षणिक उपक्रम राबवून विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक बीजे कशी रुजवता येतील याबाबत ते नेहमी प्रयत्नशील असतात. शासनाच्या विविध स्पर्धा परीक्षांचे केंद्र प्रमुख म्हणूनही सर्व जबाबदारी ते यशस्वीरित्या पार पाडत आहेत . त्याच बरोबर अनेक सामाजिक संघटना , शैक्षणिक संस्थांना मार्गदर्शन ते नेहमी करत असतात . अनेक पदव्या प्राप्त केलेले माळी सर हे एल.एल.बी बरोबर उत्तम लेखकही आहेत . त्यांच्या सामाजिक , शैक्षणिक , अनुभवी आणि प्रगल्भ विचारांतून प्रेरणा , शालेय व्यवस्थापन , शंभर नंबरी भाषण , अंधारातून प्रकाशाकडे अथा पुस्तकांचे लेखन त्यांनी केले आहे . अनेक पारितोषिके व पुरस्कारांनी सन्मानित असलेल्या भगवान माळी यांना राज्य पुरस्कार मिळाल्या बद्दल सुधागड एज्युकेशन संस्थेचेअध्यक्ष  वसंतरावजी ओसवाल ,उपाध्यक्ष , रविंद्रजी लिमये, सचिव रविकांत घोसाळकर ,कार्यवाह गीताताई पालरेचा , प्रशासन अधिकारी  मिलिंद जोशी ,संस्थेचे सर्व संचालक मंडळ , विविध विद्यालयाचे उपमुख्याध्यापक , शिक्षक ,शिक्केतर कर्मचारी यांनी माळी सरांचे अभिनंदन केले आहे.
Comments