नवी मुंबईचे पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंग यांनी साधला कळंबोलीवासीयांशी सुसंवाद ...
नवी मुंबईचे पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंग यांनी साधला कळंबोलीवासीयांशी सुसंवाद ...

पनवेल, दि.26 (संजय कदम) ः  नवीमुंबई चे पोलिस आयुक्त बिपीन कुमार सिंग यांनी कळंबोली पोलिस स्टेशन ला भेट दिली असता इतर तपासण्यांसह कळंबोलीवासियांशी सुसंवाद साधत त्यांच्या अडीअडचणी त्याचप्रमाणे पोलीस खात्यामार्फत सर्वसामान्य नागरिकांशी कसा संवाद साधला जातो याची माहिती त्यांनी घेतली.
प्रथमतः त्यांनी कळंबोली पोलीस स्टेशनची वार्षिक तपासणी केली. पोलिस स्टेशनचे अंतर्बाह्य तपासणी त्यात सर्व प्रकारचे अभिलेख, गुन्हे व तपास, शस्त्रास्त्रे, शांतता कमिटी कार्य महत्त्वाची कागदपत्रे, तसेच फायलींची तपासणी केली.त्याचबरोबर पोलीस ठाण्याचा परिसर व संबंधित सर्व बाबींची तपासणी करून पोलीस आयुक्तांनी कळंबोली पोलीस ठाणे विषयी समाधान व्यक्त करून पोलिस निरीक्षक संजय पाटील यांचे कौतुक केले. या तपासणी दरम्यान पोलीस आयुक्तांनी पोलीस कर्मचारी व अधिकार्‍यांचा दरबार घेऊन त्यांच्या असणार्‍या अडीअडचणी एकूण घेतल्या तसेच कामकाजामध्ये येणार्‍या अडचणींमध्ये विचारणा करून विचारणा केली. पोलिसांनी शारीरिक व मानसिकदृष्ट्या सक्षम राहण्यासाठी नियमित व योग्य व्यायाम करणे याबाबत सूचना दिल्या तसेच त्यांना आपल्या कामाबद्दल निष्ठा ठेवण्यास सांगितली. तसेच आयुक्तांनी कळंबोली येथील नागरिकांशी संवाद साधला. या वेळी पोलीस उप आयुक्त झोन-2 शिवराज पाटील, सहाय्यक पोलिस आयुक्त भागवत सोनवणे उपस्थित होते. या तपासणी दरम्यान आयुक्तांनी कळंबोली मधील नागरिकांशी संवाद साधला यावेळी जवळपास शेकडो नागरिक उपस्थित होते आयुक्तांनी कळंबोली पोलीस स्टेशन संदर्भात नागरिकांच्या सूचना व हरकती विचारल्या तसेच कळंबोली पोलीस स्टेशन संदर्भात काही तक्रारी असल्यास काही सांगण्याची आव्हान पोलीस आयुक्तांनी कळंबोली करांना केले. या वेळी कळंबोली येथील ज्येष्ठ नागरिक संघाने कळंबोली पोलीस स्टेशन कडून होत असणार्‍या सहकार्याबद्दल पोलीस निरीक्षक संजय पाटील व पोलिस आयुक्तांचे आभार मानले.

फोटो ः कळंबोलीवासियांशी सुसंवाद साधताना बिपीनकुमार सिंग
Comments