कायदेशीर रखवालीतून पळवून नेलेल्या अल्पवयीन मुलीला पनवेल शहर पोलिसांनी काढले शोधून...
कायदेशीर रखवालीतून पळवून नेलेल्या अल्पवयीन मुलीला पनवेल शहर पोलिसांनी काढले शोधून...

पनवेल दि.28 (वार्ताहर)- कायदेशीर रखवालीतून अज्ञात कारणास्तव फूस लावून पळवून नेलेल्या एका अल्पवयिन मुलीला पनवेल शहर पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे शोधून काढले आहे.
            करंजाडे वसाहतीत राहणारी एक अल्पवयिन मुलगी कुठेतरी निघून गेल्याची तक्रार किंवा तिचे अपहरण झाल्याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलिस ठाण्यात करताच वपोनि अजयकुमार लांडगे, पो.नी.प्रशासन विजय कादबाने, पो.नी.गुन्हे संजय जोशी आदींच्या मार्गदर्शनाखाली म. स.पो.नी.पवार, पो.उप. नि. अभयसिंह शिंदे, पो.हवा.राऊत, पो.ना.देशमुख, पो. शि. पारसुर, पो. शि.मिसाळ, पो.शि.राऊत, पो. शि.घरत, म.पो. शि. कोकणे यांनी सदर अपहरण झालेल्या मुलीचा तांत्रिक तपास करून माहिती काढली असता सदरची मुलगी उल्हासनगर कॅम्प न.4 येथे असल्या बाबत माहिती मिळाल्याने सदर ठिकाणी जावून शोध घेतला असता सदर मुलगी उल्हासनगर रेल्वे स्टेशन कॅम्प- 4 येथे मिळून आल्याने तिला ताब्यात घेण्यात आले आहे. याबाबत पुढील तपास पनवेल शहर पोलिस करीत आहेत.
Comments