मोबाईलसह घरफोडी करणार्‍या गुन्हेगारांना पनवेल शहर पोलिसांनी केले गजाआड....
मोबाईलसह घरफोडी करणार्‍या गुन्हेगारांना पनवेल शहर पोलिसांनी केले गजाआड....

पनवेल, दि.18 (वार्ताहर) ः पनवेल परिसरात मोबाईलसह घरफोडी करणार्‍या गुन्हेगारास पनवेल शहर पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून गुन्ह्यातील सहा मोबाईल हस्तगत केले आहेत.
शहरातील एस.टी.स्टॅण्ड मागील लोकमान्य नगर येथे अमेय सुर्वे यांचे एव्हीएस नावाचे मोबाईल सर्व्हीस सेंटरचे दुकान असून सदर दुकानाचे शटर उचकटून डोअर लॉक तोडून अज्ञात चोरट्यांनी आत प्रवेश करून दुरुस्तीसाठी आलेले ग्राहकांचे एकूण 13 मोबाईल ज्याची किंमत जवळपास 67 हजार रुपये इतकी होती ते अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्याची तक्रार त्यांनी पनवेल शहर पोलीस ठाण्यात दिली होती. त्यानुसार पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 चे शिवराज पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजयकुमार लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सपोनि गणेश दळवी, पोलीस उपनिरीक्षक फरताडे, पो.हवा. गंथडे, रवींद्र  राऊत, पो.ना.महेश पाटील, पो.ना.अशोक राठोड, गुन्हेगारांचे कर्दनकाळ पो.ना.भगवान साळुंके, पो.शि.राजू खेडकर, विवेक पारासूर आदींच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेज, गुप्तबातमीदार आदींच्याद्वारे या चोरट्यांची माहिती घेत असताना या गुन्ह्यातील एक आरोपी सौरभ भगवानदास बदोनिया याला सुभाषनगर मुंबई येथून ताब्यात घेतले असता त्याचा या गुन्ह्याच्या तपासात सहभाग निष्पन्न झाल्याने त्यास अटक केली आहे. व त्याच्याकडून या गुन्ह्यातील 6 मोबाईल ज्याची किंमत 39 हजार रुपये इतकी आहे हे हस्तगत करण्यात आले आहेत. या गुन्ह्यात इतरही आरोपींचा सहभाग असल्याने त्यांचा शोध पनवेल शहर पोलीस करीत आहेत.
Comments