उत्तर रायगड जिल्ह्यात ओबीसी जागर अभियानाची रथ यात्रा संपन्न...
पनवेल / वार्ताहर : -
ओबीसी बांधवाना अनेक वर्षे लागू असलेले राजकीय आरक्षण तिघाडी सरकारला सुप्रीम कोर्टात टिकवता न आल्याने ओबीसी समाजाच्या शैक्षणिक आणि नोकरीतील आरक्षणही धोक्यात आले आहे.अशा बिकट परिस्तिथीत भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रात समस्त ओबीसी बांधवाना जागृत करण्याकरिता ओबीसी जागर अभियान पुकारले. 20 नोव्हेंबर रोजी ठाण्यात या अभियानास महाराष्ट्राचे लाडके नेतृत्व देवेंद्र फडणवीस आणि ओबीसी समाजाचा सन्मान केंद्रीय मंत्री कपिल पाटील आणि मान्यवरच्या उपस्तिथीत सुरुवात झाली. भारतीय जनता पक्षाने ओबीसी मोर्च्याचे प्रदेशाध्यक्ष आ. योगेश अण्णा टिळेकर यांनीं हा जागर महाराष्ट्रभर नेण्याचा संकल्प करीत यासाठी रथयात्रेस प्रारंभ केला. योगेश अण्णांच्या संकल्पनेतील ही रथयात्रा आज महाराष्ट्रातील खेडपाड्यात, गेली मोहल्ल्यात पोहचली आहे.
माझ्या जिल्ह्यात ही रथयात्रा सारथ्य करण्याची संधी जिल्हाध्यक्ष या नात्याने मला व माझ्या सहकाऱ्यांना मिळाली. कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर आणि ओबीसीचे आधारवड, लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी या यात्रेचे पनवेल मध्ये स्वागत केले. बिघाडी सरकारने वसुलीच्या नादात ओबीसींचे राजकीय आरक्षण कसे घालवले हे प्रशांत ठाकूर यांनी रायगडकरांना सांगितले. इंपेरिकल डेटा हा राजकीय मागासलेपणाचा डेटा असतो त्याचा सेन्सस म्हणजे जनगणनेशी संबंध नाही. सेन्सस अर्थात जनगणना केंद्रसरकार करते तर इंपेरिकल डेटा राज्य मागासवर्गीय आयोग जमा करते. हे पहिल्या सर्व पक्षीय बैठकीपासून गेली 18 महिने देवेंद्रजी फडणवीस सरकारला सांगत आहेत.मात्र वेळ निघून गेल्यावर राज्य मागास वर्गीय आयोगाची स्थापना करणे, त्यास निधी न देणे, स्टाफ न देणे असे प्रकार करीत शासनाने या प्रश्नावर आपली उदासीनता प्रकट केली आहे. याच वर्मावर बोट ठेवीत सरकारची लबाडी उघड करण्याचे कार्यक्रम या रथ यात्रेने केले.
कामोठे, उरण, पनवेल शहर , कळंबोली, खारघर, पनवेल ग्रामीण, खालापूर, कर्जत आणि खोपोली अश्या भाजपच्या ९ मंडळा मधून 36 ठिकाणी सुमारे 240 किमी चा प्रवास करीत हजारो नागरिकांशी रथयात्रेने संवाद साधला. या निम्मिताने भाजपा आणि ओबीसी चळवळीतील कार्यकर्ते सक्रिय झाल्याचे पाहायला मिळाले.लोकांनाही शासनाची दुटप्पी भूमिका समजण्यास मदत झाली.
रथ यात्रेत आमच्या सर्व ओबीसी मोर्चा टीम ने चांगली मेहनत घेतली.आमंत्रण,पत्रक वाटण्यापासून, मार्ग आखने, परिसरातील मान्यवरनां बोलावून आणणे,रथ जागोजागी फिरवणे अशी सारी कामे मोठ्या हौसेने केली. महिला कार्यकर्त्या ही मोठ्या सख्येने उपस्थित राहिल्या. भाजपचे सर्व वरिष्ठ मंडळी खास करून सर्व तालुका अध्यक्ष आवर्जून सांगावेसे वाटते कि पनवेल तालुका भाजपचे अरुण भगत यांनी आपल्या वाढदिवसाच्या निम्मिताने पनवेल ग्रामीण मध्ये 12 ठिकाणी रथ नेला. या सर्वांचे मनःपूर्वक आभार.आमचे नेते ओबीसी प्रदेश उपाध्यक्ष ऍड मनोज भुजबळ, भाजपा युवा मोर्चा, महिला मोर्चा, विविध सेल, सर्व नगरसेवक, कार्यकर्ते, पत्रकार आणि पोलीस बांधव यांचे ही आभार. आमच्या ओबीसी चळवळीतील टीम ओबीसी पैकी पनवेल ग्रामीणचे मंडळ अध्यक्ष अप्पा भागित, कामोठ्याचे भाऊ भगत , पनवेल शहरचे रामनाथ पाटील, कालम्बोली चे जनार्दन पाटील, खारघरचे सुरेश ठाकूर, उरणचे हेमंत बोबले, खालापूरचे राकेश गव्हाणकर, कर्जतचे दशरथ कोसाटे, खालापूरचे सुनील नांदे यासह जिल्हा सरचिटणीस अविनाश कोळी आदिनी ही रथ् यात्रा यशस्वी होण्यास मोलाची मदत केली.
या सर्वांचे आभार भाजपचे नारायण गायकर, दशरथ बाळु म्हात्रे, संतोष भोईर, दशरथ वेल्हे आदींनी मानले.