हॉटेलमध्ये घरफोडी करून साहित्य केले लंपास....
पनवेल, दि. 20 (संजय कदम)- पनवेल जवळील मुंबई ते गोवा मार्गावरील आगरी कट्टा हॉटेलमध्ये अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून जवळपास 16 हजारांचे साहित्य चोरून नेल्याची घटना घडली आहे.
अज्ञात चोरट्याने आगरी कट्टा हॉटेलच्या स्लायडिंग खिडकीच्या उघड्या दरवाज्यावाटे आत प्रवेश करून त्याठिकाणी असलेले वेल्डिंग मशिन, ग्राईंडर मशिन, ड्रिल मशिन व वेल्डिंग केबल असा मिळून जवळपास 16 हजारांचा ऐवज चोरून नेल्याने याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलिस ठाण्यात देण्यात आली आहे.