अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू....
अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू....

पनवेल, दि. १६ (वार्ताहर) ः  मुंबई-पुणे मार्गावर कळंबोली येथील पुलावर अज्ञात वाहनाच्या धडकेत एका तरुणाला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात. सदर तरुणाचा उपचारादरम्यान, मृत्यू झाल्याची घटना घडली. कामोठे पोलिसांनी या अपघातातील अज्ञात वाहन चालकावर गुन्हा दाखल करुन त्याचा शोध सुरु केला आहे.  
या अपघातात मृत झालेल्या तरुणाचे नाव पुरोषोत्तम हेमराज (27) असे असून तो उत्तरप्रदेश राज्यातील आहे. सध्या तो याठिकाणी मेव्हण्याकडे रहाण्यास आहे. पुरुषोत्तम हेमराज हा मुंबई-पुणे मार्गावरील कळंबोली येथील पुलाजवळून रस्ता ओलांडून जात असताना, पुण्याहुन मुंबईच्या दिशने जाणाऱया अज्ञात वाहनाने त्याला धडक दिली. यात पुरुषोत्तम गंभीर जखमी होऊन त्याच ठिकाणी पडला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर कामोठे पोलिसांनी जखमी पुरुषोत्तम याला कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात दाखल केले. त्याठिकाणी उपचार सुरु असताना, त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर कामोठे पोलिसांनी पुरुषोत्तमला धडक देणार्‍या वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करुन त्याचा शोध सुरु केला आहे.
Comments