पनवेल वाहतूक शाखेने वाहिली २६/११ च्या हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली...
पनवेल वाहतूक शाखेने वाहिली २६/११ च्या हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली...
पनवेल, दि.26 (वार्ताहर) ः 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबई मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या बांधवांना पनवेल शहर वाहतूक शाखेच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक संजय कदम, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, जाधव, आवारी, नागरगोजे, अलका पाटील, साधना पवार, वैशाली पवार, सविता कदम यांच्यासह टोईंग व्हॅन वरील सर्व कर्मचारी व पनवेल वाहतूक शाखेचे आदी पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
पनवेल शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील पोलीस चौकीच्या आवारात 26/11 हल्ल्यातील शहिदांना अभिवादन करण्यात आले. यावेळी मुंबईतील दहशतवादी हल्ल्यातील शहीद पोलीस बांधवांच्या प्रतिमांना पुष्प अर्पण करून दीप प्रज्वलित करण्यात आले. देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची मुख्य राजधानी असणार्‍या मुंबईमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याला आज (दि.26 नोव्हेंबर 2021) 13 वर्षं पूर्ण झाली आहेत. भारताच्या इतिहासातील सर्वात मोठा हल्ला म्हणून त्याची नोंद झाली आहे. मुंबईतील गर्दीच्या ठिकाणी या दहशतवाद्यांनी अंदाधूंद गोळीबार देखील केला होता. त्यामध्ये लोकांसह 18 सुरक्षा रक्षकांचा मृत्यू झाला होता. त्याचबरोबर कित्येक जण जखमी झालेले होते. या हल्ल्याला 13 वर्षं पूर्ण झाली म्हणून पनवेल शहर वाहतूक विभागाच्या वतीने 26/11 च्या भ्याड हल्ल्यातील शहीद अधिकार्‍यांना आणि कर्मचार्‍यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.


फोटो ः पनवेल वाहतूक शाखेतर्फे वाहण्यात आली श्रद्धांजली
Comments