कामगार वसाहतीला लागली आग....
कामगार वसाहतीला लागली आग....

पनवेल दि.२२ (वार्ताहर)- पनवेल जवळील तळोजा फेज-२ येथील एका सिडकोच्या मास हाउसिंगचे बी.जी. शिर्के या कॉन्ट्रॅक्टरचे काम सुरू असून त्या ठिकाणी तेथील कामगारांसाठी उभारण्यात आलेल्या वसाहतीमध्ये अचानक आग लागून या आगीत काही छोट्या रूमचे मोठे नुकसान झाले आहे. 
          याठिकाणी सिडकोचे मास हाउसिंगचे काम सुरू असल्याने तिथे काम करणाऱ्या कामगारांसाठी छोट्या छोट्या पत्र्याच्या रूम बनविण्यात आल्या आहेत. या रूम मध्ये एके ठिकाणी अचानक आग लागून ती आजूबाजूला पसरत गेली. आगीची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाचे बंब व टॅंकर पाचारण करण्यात आले व आग आटोक्यात आणण्यात आली आहे. या आगीत वित्तहानी झाली असून जीवितहानी झाली नसल्याचे समजून येत आहे. सदर आग हि सिलेंडरच्या स्फोटाने लागल्याचे प्राथमिक माहिती मिळत आहे.
Comments