वाहतूक शाखेचे विना हेल्मेट चालक विरोधात धडक कारवाई ; आठवड्याभरात 8488 मोटार सायकल चालकांवर कारवाई ...
वाहतूक शाखेचे विना हेल्मेट चालक विरोधात धडक कारवाई ; आठवड्याभरात 8488 मोटार सायकल चालकांवर कारवाई ...
पनवेल, दि.10 (वार्ताहर) ः नवी मुंबई वाहतूक शाखेने विना हेल्मेट दुचाकी चालविणाऱ्या चालकावर तसेच विना हेल्मेट दुचाकीवर मागे बसणार्‍या व्यक्तीं विरोधात विशेष मोहीम राबवून त्यांच्यावर धडक कारवाईला सुरुवात केली आहे. त्यानुसार वाहतूक शाखेने 29 ऑक्टोबर ते 8 नोव्हेंबर दरम्यान नवी मुंबई पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत विशेष मोहिमेद्वारे एकूण 8488 विना हेल्मेट दुचाकी चालविणार्‍या चालकावर तसेच विना हेल्मेट दुचाकीवर मागे बसणार्‍या व्यक्तींवर कारवाई केली आहे.
नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत दुचाकी वाहनांच्या अपघातांत तसेच त्यातील मृतामध्ये वाढ होत असल्याचे आढळून आले आहे. यातील बहुतांश अपघात हे हेल्मेट न घातल्यामुळे झाल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे दुचाकी वर पाठीमागे बसणार्‍या व्यक्तीला सुद्धा हेल्मेट घालणे गरजेचे झाले आहे. असे असतानाही अनेक दुचाकी चालक हेल्मेट घालत नसल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे नवी मुंबई वाहतूक शाखेने विना हेल्मेट दुचाकी चालविणाऱया चालकावर 29 ऑक्टोबर पासून विशेष मोहिम सुरु केली आहे. या मोहिमे दरम्यान विना हेल्मेट दुचाकीवर मागे बसणाऱया व्यक्तींवर देखील कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. 
त्यानुसार 29 ऑक्टोबर रोजी 1300 दुचाकीस्वारांवर, शनिवारी 30 ऑक्टोबर 2100, 31 ऑक्टोबर रोजी 1500, 1 नोव्हेंबर 1300, 2 नोव्हेंबर 1397 तर 8 नोव्हेंबर  रोजी 891 अशा एकूण 8488 दुचाकीस्वारांवर नवी मुंबई वाहतूक पोलिसांनी कारवाई केली आहे. या कारवाईत विना हेल्मेट दुचाकीवर मागे बसणाऱ्या व्यक्तींवर देखील कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, नवी मुंबई पोलिस आयुक्तालय हद्दीत दुचाकी चालविताना चालकाने आणि दुचाकीवराबरोबर मागे बसलेल्या व्यक्तीने डोक्यावर हेल्मेट घालून सुरक्षित प्रवासांसाठी वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन नवी मुंबई वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त पुरषोत्तम कराड यांनी केले आहे.
Comments