तालुका विधी सेवा समितीच्यावतीने "कायदेशीर सहाय्य सेवा योजना" कार्यक्रमाचे आयोजन...
पनेवल,दि.26 : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणामार्फत ‘पॅन् इंडिया अवेरनेस चे भारतभर आयोजन करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने तालुका विधी सेवा समिती, जिल्हा न्यायाधीश-1 आणि अतिरिक्त सत्र न्यायाधीश, पनेवल यांच्यावतीने आज (दि.26) महात्मा गांधी उद्यानात ‘कायदेशीर सहाय्य सेवा योजना' ( shemes of Legal Aid Sevice) बाबत अमिटी विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी आणि पॅरा लिगल वॉलिंटिअर्स यांच्या मार्फत मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी स्थायी लोक अदालत, सार्वजनिक उपयुक्तता सेवा याबद्दलची माहिती उपस्थितांना देण्यात आली. याचबरोबर उपस्थितांच्या प्रश्नांना स्वयंसेवकांनी मार्गदर्शन केले. यावेळी महापालिकेतील विविध विभागांचे प्रतिनिधी तसेच नागरिक उपस्थित होते. महापालिकेच्या विधी विभागाच्या सहकार्यातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.