एन.ओ.सी.च्या वादातून एकास मारहाण....
एन.ओ.सी.च्या वादातून एकास मारहाण....

पनवेल  दि. २४  (संजय कदम)- एनओसीच्या देण्याच्या वादातून तिघांनी मिळून एकास मारहाण केल्याची घटना झोझेवाला पेट्रोल पंप भिंगारी जवळ घडली आहे.

             फिर्यादी अक्षय पांडे (वय-34) हे आरोपी चेतन गुप्ता सोबत त्याठिकाणी गेले असता त्यांच्या कामगारांच्या एनओसीच्या वादातून त्यांच्यात शाब्दिक बोलाचाली झाली. यावेळी अक्षय पांडे याने एनओसी देण्यास नकार दिला असता तेथे असलेल्या प्रिंसकुमार दुबे (वय-25), चेतन गुप्ता व प्रमोदकुमार दुबे या तिघांनी मिळून हातात घालायच्या स्टीलच्या कड्याने अक्षय पांडे याला मारहाण करून जखमी केले. याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलिस ठाण्यात केली आहे.
Comments