लोकनेते रामशेठ ठाकूर व ऍड रविंद्र पवार यांच्या हस्ते रयत शिक्षण संस्थेच्या 'शिवविजय' वार्षिक नियतकालिकाचे प्रकाशन...
पनवेल वैभव वृत्तसेवा : -  रयत शिक्षण संस्थेच्या सातारा येथील छत्रपती शिवाजी कॉलेजचा सन २०२०-२१ ची ‘शिवविजय’ ही वार्षिक नियतकालिका संस्थेच्या १०२ व्या वर्धापन दिनानिमीत्त प्रकाशित करण्यात आली आहे. या नियतकालिकेचे प्रकाशन रयतचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर आणि ऍडव्होकेट रवींद्र पवार यांच्या यांच्या हस्ते झाले.  
यावेळी रयत शिक्षण संस्थेचे सचिव व छत्रपती शिवाजी कॉलेजचे प्राचार्य डॉ. विठ्ठल शिवणकर, संस्थेचे ऑडिटर प्राचार्य डॉ.शिवलिंग मेनकुदळे, माध्यमिक विभागाचे सहसचिव संजय नागपुरे,  उपप्राचार्य डॉ.अनिलकुमार वावरे, रामराजे माने-देशमुख, रोशन शेख, सुभाष वाघमारे, पोर्णिमा मोटे यांच्यासह प्राध्यापक वृंद उपस्थित होते.
Comments