इलेक्ट्रीक पोल फिटींगचे साहित्य चोरणार्‍या महिला पोलिसांच्या ताब्यात....
इलेक्ट्रीक पोल फिटींगचे साहित्य चोरणार्‍या महिला पोलिसांच्या ताब्यात....

पनवेल, दि.4 (वार्ताहर) ः इलेक्ट्रीक पोल फिटींगचे साहित्य चोरणार्‍या चार पैकी तीन महिलांना पनवेल तालुका पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
इलेक्ट्रीक कॉन्ट्रक्टर दर्शन पाटील यांचे जी.आय.चे एल.टी.स्टे. क्लॅम्प जॉईंट लग अ‍ॅल्युमिनिअम, यु क्लॅम्प असा ऐवज त्यांनी बोरले गावाच्या हद्दीत त्यांच्या घरासमोरील मोकळ्या जागेत ठेवला असताना आरोपी नेहा काळे (27), अर्चना भोसले (32), पार्वती जाधव (42), कृष्णा भाले (27) यांनी आपसात संगनमत करून सदर माल चोरुन नेला. त्याची किंमत 11 हजार 525 रुपये इतकी होती. 

याबाबतची तक्रार पनवेल तालुका पोलीस ठाण्यात करताच वपोनि रवींद्र दौंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. (गुन्हे) अंकुश खेडकर, सपोनि पाळंदे, पो.उप.भरत पाटील आदींच्या पथकाने या गुन्ह्यातील तीन महिलांना ताब्यात घेतले आहे. यांच्या अटकेमुळे अजूनही काही चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
Comments