मोबाईलसह रोखरक्कम केली लंपास....
मोबाईलसह रोखरक्कम केली लंपास....

पनवेल  दि.31 (संजय कदम): राहत्या गाळ्याच्या उघड्या शटरद्वारे अज्ञात चोरट्यांनी आत प्रवेश करून त्याठिकाणी असलेले मोबाईल फोन व रोखरक्कम चोरून नेल्याची घटना पनवेल तालुक्यातील वावंजे येथे घडली आहे.           सरिफुल्ला अफिजुल्ला चौधरी (वय-26) यांचे रेहमान नगर सुन्नी मजिद जवळ वावंजे या ठिकाणी गाळा असून त्याठिकाणीच ते राहतात. सदर ठिकाणी अज्ञात चोरट्यांनी आत प्रवेश करून त्याठिकाणी असलेले दोन मोबाईल फोन व रोखरक्कम 19 हजार असा मिळून जवळपास 34 हजारांचा ऐवज चोरून नेल्याने याबाबतची तक्रार पनवेल तालुका पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.
Comments