आद्यक्रांतीवर वासुदेव बळवंत फडके माध्यमिक विद्यालयाच्या स्थानिक स्कूल कमिटीच्या अध्यक्षपदी पांडुरंग मुकादम यांची निवड....
आद्यक्रांतीवर वासुदेव बळवंत फडके माध्यमिक विद्यालयाच्या स्थानिक स्कूल कमिटीच्या अध्यक्षपदी पांडुरंग मुकादम यांची निवड....

पनवेल, दि.21 (वार्ताहर) ः आद्यक्रांतीवर वासुदेव बळवंत फडके माध्यमिक विद्यालयाच्या स्थानिक स्कूल कमिटीच्या अध्यक्षपदी पांडुरंग मुकादम यांची निवड करण्यात आली आहे.
सुधागड एज्युकेशन सोसायटीचे शिरढोण तालुका पनवेल येथे आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके माध्यमिक विद्यालय आहे. सदर कमिटीच्या अध्यक्षपदी विश्‍वनाथ भोपी हे कार्यरत होते. परंतु प्रकृती अवस्थामुळे रिक्त झालेल्या जागेवर माजी सरपंच पांडुरंग मारुती मुकादम यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल मा.सरपंच बाळाराम गोमा भोपी, मा.जि.प.सदस्य रामशेठ भोईर, मा.सरपंच धनाजी महाडिक यांच्यासह मारुती महाडिक, श्याम ठोंबरे, राजेंद्र टकले, ताई कातकरी (सरपंच), कांचन मुकादम, राम हातमोडे, चंद्रकांत ठोंबरे, साधनाताई वाजेकर, संजय महाडिक, हरी भोईर, पांडुरंग चौधरी, सुधा माळी, रेश्मा वाजेकर, नारायण कर्णेकर, नामदेव टकले, गणेश भोपी, सागर कर्णेकर, अरुण भोपी, भरत भोईर, रविकांत मुकादम, अविनाश वाकडीकर, मोहन पवार, वसंत मुंबई, पद्माकर कातकरी, सचिन खुटले, सदा खुटले, सुदाम माळी, कान्हा भोपी आदी ग्रामस्थांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
Comments