आगरी सेना नाशिक उपजिल्हाप्रमुखपदी सुचित पाटील....
आगरी सेना नाशिक उपजिल्हाप्रमुखपदी सुचित पाटील....
पनवेल(प्रतिनिधी): नाशिक येथील मधुबन सर्व्हिसेस व आर.के.प्लॅनर अँड मैंटनन्सचे सर्वेसर्वा रविंद्र पाटील यांचे सुपुत्र तसेच पनवेल तालुका पत्रकार महासंघाचे अध्यक्ष तथा रायगड शिव सम्राटचे संपादक रत्नाकर पाटील यांचे जावई सुचित रविंद्र पाटील यांची आगरी सेनेचे संस्थापक अध्यक्ष राजाराम साळवी यांनी आगरी सेनेच्या नाशिक उपजिल्हाप्रमुखपदी नुकतीच नियुक्ती केली आहे. 
         
 सुचित पाटील हे नाशिक जिल्हयातील एक उद्योजक आहेत, ते मूळचे पेण तालुक्यातील कणे या गावचे रहिवासी आहेत. वडीलांच्या उद्योग व्यवसायामुळे ते नाशिक येथेच स्थायिक झाले आहेत. आपण समाजाचे ऋणी आहोत, या अनुषंगाने नाशिक जिल्ह्यात विखुरलेला आगरी समाज एकत्र करण्यासाठी उद्योग सांभाळून समाज एकत्र आणल्याचा त्यांचा मानस असल्याचे त्यांनी नियुक्ती प्रदान सोहळ्याप्रसंगी सांगितले.
        ते पुढे म्हणाले की, आजही नाशिक जिल्ह्यात आगरी सेनेचे प्रस्थ आहे, त्यामुळे युवापिढीला सोबत घेऊन आगरी सेना अजून बळकट करण्यासाठी अध्यक्ष राजाराम साळवी आणि जिल्हाप्रमुख संपत डावखर यांच्यासह ज्येष्ठांच्या नेतृत्वाखाली मी काम करणार असल्याचे आवर्जून सांगितले.
            आगरी सेनेच्या ठाणे येथील मुख्य कार्यालयात संपन्न झालेल्या कार्यक्रमात आगरी सेनेचे अध्यक्ष राजाराम साळवी यांच्या हस्ते सुचित पाटील यांना उपजिल्हाप्रमुख पदाचे नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी  ते सपत्नीक कन्येसह हजर होते. सदर कार्यक्रमास आगरी सेनेचे महाराष्ट्र राज्य युवा अध्यक्ष राहुल साळवी, प्रदेश कामगार एकता कार्याध्यक्ष प्रदिप साळवी, महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख मनोज साळवी, महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष गणपत दादा कडू, नाशिक जिल्हाप्रमुख संपत डावखर, जेष्ठ नेते रघुनाथ तोकडे, रवीशेठ पाटील, लालु दुभाषे,  सखाराम जोशी, संपतराव म्हसने, महाराष्ट्र प्रदेश युवा उपाध्यक्ष गणेश कडू, तालुका प्रमुख विठ्ठल लंगडे, जिल्हा कार्याध्यक्ष अरुण भागडे उपस्थित होते. यावेळी अनिल भोपे, भालचंद भागडे, भाऊराव भागडे, निलेश जोशी, शाम चौव्हान, कैलास कडू, धनराज म्हसने, सिध्देश आडोळे यांच्यावर नेतृत्वाने आगरी सेनेची नवीन धुरा सोपवली असल्याचे सांगण्यात आले.
Comments