गावठी दारु हस्तगत....
गावठी दारु हस्तगत....

पनवेल, दि.4 (वार्ताहर) ः पनवेल तालुक्यातील पोयंजे गावाच्या हद्दीत बेकायदेशीररित्या गावठी दारु जवळ बाळगणार्‍या एका इसमास पनवेल तालुका पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
तालुक्यातील पोयंजे गावाच्या हद्दीत गावदेवी मंदिराच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत आरोपी रोहिदास चोरघे (32) याने बेकायदेशीररित्या गावठी हातभट्टीची दारु जवळ बाळगल्याची माहिती वपोनि रवींद्र दौंडकर यांना मिळताच त्यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उपनिरीक्षक आकाश पवार, सहा.फौ.मनोहर चव्हाण, पो.ना.राकेश मोकल आदींच्या पथकाने त्या ठिकाणी छापा टाकून त्याच्याकडून जवळपास 300 रुपये किंमतीची गावठी दातभट्टी दारु हस्तगत केली आहे. व त्याच्या विरोधात महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम 67 (ई) प्रमाणे कारवाई केली आहे.
Comments
Popular posts
दिशा महिला मंच तर्फे नवी मुंबईतील कर्तृत्ववान महिलांना "नवदुर्गा पुरस्कार" देऊन सन्मान...
Image
महाराष्ट्र पोलीसांचा सातासमुद्रापार झेंडा ; सहाय्यक पो.नि. सुभाष पुजारी यांनी जागतिक शरीरसौष्ठव स्पर्धेत पटकाविले ब्रॉन्झ मेडल....
Image
बाळासाहेब ठाकरे लॉ कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे मुंबई हायकोर्टात "ती" नावाचे पथनाट्य सादर....
Image
खांदा कॉलनी युवासेने तर्फे जेष्ठ नागरिकांना मोफत चष्मे वाटप व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न....
Image
शिवसेनेच्या कार्यप्रणालीवर प्रेरित होऊन खारघर मधील शेकडो महिला व पुरुषांचा सेनेत जाहीर पक्ष प्रवेश ....
Image