दारूच्या नशेत लाकडी दांडक्याने मुलाने केली आईला मारहाण....
दारूच्या नशेत लाकडी दांडक्याने मुलाने केली आईला मारहाण....

पनवेल / दि. २४ (संजय कदम) - दारूच्या नशेत लाकडी दांडक्याने मुलाने स्वतःच्या आईला मारहाण केल्याची घटना तालुक्यातील करंबेळी गावात घडली आहे.
         याठिकाणी राहणाऱ्या सौ. धर्मी खंडू पारधी (वय-55) या त्यांच्या घरासमोर पती यांच्यासह गप्पा मारत बसल्या असताना त्यांचा मोठा मुलगा सुकऱ्या पारधी (वय-40) हा दारूच्या नशेत तेथे आला व वडिलांकडे पैशांची मागणी करू लागला. परंतु त्यांनी नकार दिल्याने तो त्यांच्या अंगावर धावून हाताने मारहाण करत असताना धर्मी पारधी यांनी त्यास समजवण्याच्या प्रयत्न केला असता सुकऱ्या याला राग येऊन त्याने लोखंडी कुऱ्डीच्या लाकडी दांडका आईच्या डोक्याच्या पाठीमागील बाजूस मारून तिला दुखापत केल्याने याबाबतची तक्रार पनवेल तालुका पोलिस ठाण्यात केली आहे.
Comments