एसबीआय बँकेसह आयकर विभागाचे नोकरीचे खोटे नियुक्तीपत्र देवून ६ लाख ७५ हजार उकळले...
एसबीआय बँकेसह आयकर विभागाचे नोकरीचे खोटे नियुक्तीपत्र देवून ६ लाख ७५ हजार उकळले...

पनवेल, दि. २९ (संजय कदम) ः तीन जणांनी संगनमत करून तुम्हाला एसबीआय बँक व आयकर विभागात नोकरीस लावतो असे सांगून तसेच त्या संदर्भातील खोटे नियुक्तीपत्र देवून 6  लाख 75 हजार रुपये उकळल्याची घटना पनवेल परिसरात घडली आहे.
पनवेल जवळील शिरढोण येथे राहणार्‍या एका 30 वर्षीय गृहिणीस आरोपी श्रावणी सुर्वे, अभय पाटील तसेच दिल्ली येथून आलेला एक अनोळखी इसम यांनी आपसात संगनमत करून सदर महिलेला एसबीआय बँकेत नोकरी देण्याचे त्याचप्रमाणे त्यांच्या दुसर्‍या सहकारी यांना आयकर विभागामध्ये नोकरी देण्याचे आमिष दाखवून त्यांना खोटे (बनावट) नियुक्तीपत्र देवून त्या दोघींचा विश्‍वास संपादन करून लबाडीच्या इराद्याने त्यांच्याकडून या त्रिकुटाने वेगवेगळ्या बँकेतून पैसे वळते करून व रोख रक्कम घेवून अशी जवळपास 6 लाख 75 हजार रुपये किंमतीची फसवणूक केल्याची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
Comments