पिल्लई कॉलेज येथे कॉन्फरन्स ऑन टेक्नॉलॉजीज फॉर फ्युचर सिटीज २०२१ श्रृंखलेतील दुसरी परिषद संपन्न.....
पिल्लई कॉलेज येथे कॉन्फरन्स ऑन टेक्नॉलॉजीज फॉर फ्युचर सिटीज २०२१ श्रृंखलेतील दुसरी परिषद संपन्न.....
पनवेल दि. १७ (वार्ताहर)- आयईईई द्वारा प्रस्तुत एआयसीटीई प्रायोजित कॉन्फरन्स ऑन टेक्नॉलॉजिज फॉर फ्युचर सिटीज -3 नवीन पनवेल येथील पिल्लई कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथे कॉन्फरन्स ऑन टेकनॉलॉजिज फॉर फ्युचर सिटीज २०२१ या  श्रृंखलेतील दुसरी परिषद नुकतीच यशस्वीरित्या संप्पन झाली.            हि परिषद आयईईई व एआयसीटीई यांनी प्रायोजित केली. या परिषदेमध्ये आपले संशोधन मांडण्यासाठी एकंदर ६ गट उपलब्ध होते सॉफ्टवेअर हार्डवेअर ( पदार्थ विज्ञान ) मटेरिअल्स , सिस्टिम्स , प्लॅनिंग आणि हेल्थकेअर यामध्ये सर्व मिळून १२० जणांनी आपले संशोधन भाषणाद्वारे किंवा भित्तीपत्रकाद्वारे मांडले . या व्यतिरिक्त १५० जणांनी परिषदेला हजेरी लावली . उदघाटन पर भाषणात डॉ . आर के शेवगांवकर ( आय आय टी मुंबई) मधील मानद प्राध्यापक असे प्रतिपादन केले कि यंत्राला ' माणूसपण ' कधीच प्राप्त होऊ शकणार नाही . त्यामुळे कृत्रिम बुद्धिमत्तेचा तांत्रिक क्षेत्रातील वापर ( या पार्श्वभूमीवर ) काहीसा मर्यादितच असावा लागेल. आय आय टी मुंबई मधील प्राध्यापक डॉ . प्रदीप्ता बॅनर्जी आपल्या देशाच्या ( भारताच्या संदर्भात वाढत्या शहरीकरणावर टिपणी केली . पिल्लई कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधील शहरांच्या वाढीचा अभ्यास करणारा व त्यावर संशोधन करणाऱ्या विभागाचा ( Urban Expansion Observatory ) आवर्जून उल्लेख केला . डॉ . संजय ओक ( पद्मश्री डॉ . डी . वाय . पाटील विद्यापीठाचे माजी कुलगुरू ● कौशल्य हॉस्पिटल ठाणे या ट्रस्टचे सध्याचे अधिष्ठाता , महाराष्ट्र राज्याच्या कोविड १ ९ टास्क फोर्स चे संचालक ) आरोग्य क्षेत्रातील भविष्यातील तांत्रिक बाबी याचा ऊहापोह केला . त्यांनी या गोष्टींवर भर दिला कि प्रयोगशाळेतील संशोधन हे सामान्य माणसापर्यंत पोहचले पाहिजे . उदाहरणा दाखल त्यांनी सांगितले कि अग्नीबाणाकरिता विकसित केलेले तंत्रज्ञान शारिरीक अपंगांकरिता कसे उपयोगाला आले . सद्यस्थितीला कोविड रुग्णालयात यंत्रपरिचारिका हा कसा योग्य पर्याय असू शकतो हे निदर्शनास आणले . कुत्रिम बुद्धिमत्ते पेक्षा आरोपित ( आरोपण केलेली ) बुद्धिमत्ता असे म्हणणे जास्त समर्पक आहे . पिल्लई कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग चे एक मुख्य अधिकारी डॉ . प्रियम पिल्लई यांनी केले कि कोविड रुग्णांची नोंद ठेवणारे केंद्र विकसित करून पिल्लई कॉलेज ने राष्ट्रीय स्तरावर आपले योगदान दिले आहे . कोविड चे प्रसारण रोखण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना त्याचा नक्कीच उपयोग झाला आहे . पिल्लई कॉलेजमधील उपलब्ध ड्रोन तंत्रज्ञानाचा सिडको प्रशासनाला शहर नियोजना साठी कसा उपयोग झाला तसेच कॉलेज मधील अर्बन एक्स्पान्शन ऑब्झवेटरी मध्ये तयार झालेल्या माहितीचा शहरांच्या विकासाशी निगडित संशोधनाकरीत कसा वापर होऊ शकतो याचा उल्लेख केला . कोविड महामारीने जरी जगाचे भरपूर नुकसान केले असले तरी काही तांत्रिक बाबीच्या वापरकारिता ती इष्टापत्ती ठरली आहे असे सवेद म्हणावे लागेल . जसे की जगभरातील शास्त्रज्ञांना संवाद साधणे शक्य झाले . भारतातही ऑनलाइन तंत्रज्ञानाच्या वापराने भरपूर वेग घेतला आहे . सोडेकच्या वरिष्ठ संचालक डॉ. पद्मजा जोशी तसेच बेल्जियम मधील लूवेन शहरातील कैथोलिक यूनिवर्सिटेट मधील पदार्थ तंत्रज्ञ विभागातील प्राध्यापक डॉ. विरले वदगिनस्ते यांची भाषणे ऑनलाइन माध्यमातून ऐकता आली. डॉ. पद्मजा जोशी यांनी ब्लॉक चेन या नविन तंत्राचा वापर तसेच आधुनिक शहराच्या विकास नियोजनात त्याचे महत्त्व विशद केले.डॉ. विरले बंदगिनस्ते यानी शहारांच्या ऊर्जा वर्गीकरणावर भाष्य केले. सदर परिषदेच्या सांगता समारंभाच्या थोडे आधी नामवन्ताच्या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. यामध्ये श्री उदयभास्कर डॉ. विजय कुलकर्णी, डॉ. सत्यनारायण डॉ. रामास्वामी श्रीम. अनुपमा करानम आणि उपेंद्र भाटे यांचा सहभाग होता . विषय होता भविष्यातील आधुनिक शहरावर होणारे परिणाम .डॉ. रामास्वामी ( ओ पी जे एस विद्यापीठाचे कुलगुरु ) यांनी समारोपाचे भाषण केले. कोविड काळाने दिलेल्या काही सकारात्मक गोष्टी आणि विशेषकरून भारतात दिसून आलेले ऑनलाइन शिक्षणाचे वैशिष्ट्य याचे त्यांनी विवेचन केले. सभागृहातील सर्व उपस्थितांच्या मनामध्ये ही बाब चांगलीच बिंबली असल्याचे दिसून आले. श्रीमती. अनुपमा करानम ( नैना सिडको मधील वरिष्ठ नियोजन अधिकारी ) या सन्माननीय अतिथि होत्या.आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराबरोबरच त्यामुळे व्यवस्थेवर सकारात्मक परिणामाचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले . सर्वं वक्त्यांनी ऐसे प्रतिपादन केले की शहरानी नुसतेच आधुनिक बनून चालणार नाही तर त्यातल्या सर्व सोयीचा वापर पुढच्या पिढयानाही योग्य प्रकार चालू ठेवता आला पाहिजे याकडे विशेष लक्ष द्यावे लागेल . आय ' ई ई . ई . चा जो मुख्य उद्देश आहे मानव कल्याणकारिता तंत्रज्ञानातील आधुनिकता याला अनुसरूनच सदर परिषदेचे आयोजन होते असे म्हणता येईल.           

फोटोः पिल्लई कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथे संपन्न झालेली परिषद.
Comments