भाजपचे युवा नेते केदार भगत व सह्याद्री मित्र मंडळाच्या माध्यमातून सुगंधी उटण्याचे वाटप...
भाजपचे युवा नेते केदार भगत व सह्याद्री मित्र मंडळाच्या माध्यमातून सुगंधी उटण्याचे वाटप...

पनवेल : - दिवाळी निमित्त भाजपचे युवा नेते केदार भगत आणि सह्याद्री मित्र मंडळाच्या माध्यमातून सुगंधी उटण्याचे वाटप करण्यात येणार आहे. या उपक्रमाची सुरुवात माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख उपस्थितीत सोमवारी करण्यात आली. 
या वेळी सचिन भगत, पत्रकार विशाल सावंत, शिव वाहतूक संघटनेचे रायगड जिल्हाध्यक्ष दत्ता केंद्रे, नितेश भगत, संकेत दसवते, शेषनाथ गायकर, योगेश साळवी, रवी पारचे, सुमित दसवते, हर्षद गडगे, भावेश शिंदे, इस्माईल मुल्ला, अजित सिंग आदी उपस्थित होते.
Comments