बालकामगार नियुक्त केल्याने गुन्हा दाखल.....
बालकामगार नियुक्त केल्याने गुन्हा दाखल.....

पनवेल, दि.12 (वार्ताहर)  : -   कळंबोली येथील श्री जी स्विटस अंड स्नॅकस येथे बालकामगार नियुक्त केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कळंबोली रोडपाली सेक्टर 20 येथील श्री जी स्वीट्स अंड स्नेक्स येथे बाल कामगार काम करत असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष गुन्हे शाखा यांना मिळाली होती.  त्यानुसार त्यांनी या ठिकाणी काम करणार्‍या दोन बालकामगारांना ताब्यात घेतले. स्वीट चालक मालक यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
Comments