दिशा महिला मंच तर्फे नवी मुंबईतील कर्तृत्ववान महिलांना "नवदुर्गा पुरस्कार" देऊन सन्मान...
दिशा महिला मंच तर्फे नवी मुंबईतील कर्तृत्ववान महिलांना "नवदुर्गा पुरस्कार" देऊन सन्मान....
पनवेल / वार्ताहर  : -  दिशा कल्चरल इव्हेंट्स प्रस्तुत दिशा महिला मंच आयोजित नवी मुंबई परिसरातील कर्तृत्ववान महिलांचा सत्कार "नवदुर्गा पुरस्कार" सोहळ्याचे आयोजन क्लासिक बँक्वेट हॉल, सेक्टर 16 कामोठे या ठिकाणी 13ऑक्टोबर रोजी पार पडला.  या प्रसंगी कार्यक्रमास ABP माझा च्या वृत्तनिवेदक डॉ कविता राणे कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होत्या.
आलेल्या आव्हानाला सामोरे जाऊन प्रतिकूल परिस्थिती अनुकूल बनवत स्वतःला सिद्ध करत समाजातील विविध घटकांच्या उद्धारासाठी स्वतःला झोकून देत कार्य करीत असलेल्या नवदुर्गाना यावेळी सन्मानित करण्यात आले अशी माहिती दिशा व्यासपीठाच्या संस्थापक निलम आंधळे यांनी दिली.
डॉ कविता राणे यांनी नवदुर्गाचे कौतुक करत 'ती' च्या अस्तित्वाची जाणीव व खडतर प्रवास व यशाचा मार्ग यावर मार्गदर्शन केले.
डॉ. स्नेहलता खडबडे यांनी कार्यक्रमाचे कौतुक करत दिशा व्यासपीठातील एक महिलेची डिलेव्हरी इथूनपुढे वर्षातून एकदा यशोधा हॉस्पिटल मार्फत फ्री करून देण्याचेही ग्वाही दिली.
 यावेळी सन्मानमूर्ती सौ. अनिता कोलते,ऐश्वर्या मोहिते, स्मिता जाधव,ज्योती नाडकर्णी,कांचन कदम, वंदना पोपळकर,वनिता जाधव, वंदना गुळवे,प्राजक्ता शाह,रेखा ठोंबरे या सन्मानमूर्तिना नवदुर्गा पुरस्काराने  डॉ कविता राणे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संगीता थोरात व  दिशा व्यासपीठाच्या उपाध्यक्ष विद्या मोहिते यांनी केले. इंदू झा,डॉ स्नेहलता खडबडे,जयेश लोखंडे,सखाराम जांभुळकर, प्रकाश राठोड,माधुरी पानसरे,यांच्या सहकार्याने व संस्थेच्या अध्यक्ष निलम आंधळे यांच्या मार्ग दर्शनाखाली हा उपक्रम यशस्वी झाला.
Comments