सामाजिक बांधीलकीतून सीतापराव दांपत्याने स्वीकारले वंचित बालकांचे पालकत्व...

शैक्षणिक सहाय्यतेसाठी ग्राम संवर्धन संस्थेला दिला ६१ हजार रुपयांचा धनादेश

पनवेल वैभव / मुंबई : -  विलेपार्ले-मुंबई येथील कोकण कट्टा ह्या स्वंयंसेवी संस्थेचे सदस्य सौ. रुपाली व विनेश सीतापराव या दाम्पत्यांनी सामाजिक बांधीलकी जपत पनवेल तालुक्यातील ग्राम संवर्धन सामाजिक संस्था संचलित बालग्राम प्रकल्पातील वंचित बालकांचे पालकत्व स्वीकारून त्यांना शैक्षणिक सहाय्यतेसाठी ६१ हजार रुपयांची आर्थिक मदत केली आहे. सौ. रुपाली आणि श्री. विनेश सितापराव यांची कन्या वैष्णवी हिचे मागील वर्षी असाध्य आजाराने निधन झाले होते. तिच्या प्रथम स्मृती दिना निमित्त रविवारी (३ ऑक्टोबर) ला आपले वैयक्तिक दुःख बाजूला ठेवून सीतापराव दाम्पत्यांनी आपली सामाजिक बांधिलकी जपत बालग्राम मधील वडिलांचे छत्र हरवलेल्या चार मुलींचे पालकत्व स्वीकारून ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर, बालग्राम प्रकल्प समन्वयक उदय गावंड, समुपदेशक जयेश शिंदेंसह बालकांच्या उपस्थित ६१ हजार रुपयांचा धनादेश देत आर्थिक मदत कली आहे.

भविष्यातही अशा वंचित व गरजू बालकांसाठी मदत करण्याचे आश्वासन यावेळी विनेश सीतापराव यांनी दिले. ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेच्या वतीने बालग्राम प्रकल्पाच्या माध्यमातून पनवेल तालुक्यातील कर्नाळा परिसरातील अनाथ, वंचित, आदिवासी आणि आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांतील बालकांचे पालकत्व स्वीकारून अशा बालकांना शिक्षण, आरोग्य, पोषण, कपडे, क्रीडा, मनोरंजनासह त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करीत आहे.
Comments
Popular posts
दिशा महिला मंच तर्फे नवी मुंबईतील कर्तृत्ववान महिलांना "नवदुर्गा पुरस्कार" देऊन सन्मान...
Image
बाळासाहेब ठाकरे लॉ कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे मुंबई हायकोर्टात "ती" नावाचे पथनाट्य सादर....
Image
महाराष्ट्र पोलीसांचा सातासमुद्रापार झेंडा ; सहाय्यक पो.नि. सुभाष पुजारी यांनी जागतिक शरीरसौष्ठव स्पर्धेत पटकाविले ब्रॉन्झ मेडल....
Image
खांदा कॉलनी युवासेने तर्फे जेष्ठ नागरिकांना मोफत चष्मे वाटप व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न....
Image
मा.उपमहापौर विक्रांत पाटील यांनी केला जागतिक शरीर सौष्ठव स्पर्धेत कांस्यपदक विजेते सुभाष पुजारी यांचा विशेष सत्कार....
Image