तळोजा पोलीस करीत आहेत अपघातग्रस्त वाहनाचा शोध....
तळोजा पोलीस करीत आहेत अपघातग्रस्त वाहनाचा शोध....

पनवेल, दि. 23  (संजय कदम) ः पनवेल जवळील तळोजा येथील मुंब्रा-पनवेल रोडवर तळोजा गाव पापडीचा पाडा गावासमोर झालेल्या अपघातात एका इसमाचा मृत्यू झाला असून सदर मृत्यूप्रकरणी कारणीभूत असलेल्या अपघातग्रस्त वाहनाचा शोध तळोजा पोलीस करीत आहेत.
सदर अपघातात गणेश दाजी जाधव (30 रा.तळोजा) यांना एका अज्ञात वाहनाने ठोकर दिल्याने त्यांचा भोला अस्लम पठाण यांच्या दुकानासमोर अपघातात मृत्यू झाला आहे. 
सदर अपघात झाला त्यावेळी कोणीही अपघात पाहिला असेल किंवा ज्या वाहनाने अपघात केला त्या वाहनाचा प्रकार, वाहनाचा नंबर किंवा इतर माहिती कोणाकडे असल्यास त्यांनी तळोजा पोलीस ठाणे दूरध्वनी 022-27412333, 9664599191 किंवा पो.उपनिरीक्षक विजय यादव यांच्याशी संपर्क साधावा.
Comments