नविन पनवेलमधील रस्त्यांवरील मेन होल वरील झाकणे ठरतायेत अपघाताला आमंत्रण..
पनवेल / वार्ताहर : - गतवर्षी सिडकोने नविन पनवेलमध्ये लाखो रुपये खर्च करुन नविन रस्ते बनविले मात्र निकृष्ट दर्जाच्या कामामुळे रस्त्यांवरील मेन होलची झाकणे रस्त्याच्या खाली गेल्यामुळे मोठ्या प्रमाणात चारचाकी, दुचाकी गाड्यांचे अपघात होत असतात .नविन पनवेल बांठीया शाळेसमोरिल रस्ता, सेक्टर 14 जवळील आमराईच्या रस्त्यावर तसेच सेक्टर 17 जवळील रेल्वेस्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्यांवरील मेन होल वरील झाकणे तुटलेली अवस्थेत आहेत.या रस्त्यांवर गाड्यांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते, यामुळे येथिल मेन होल वरील झाकणे तात्काळ दुरुस्त करावी अशी येथिल नागरिकांनी मागणी केली आहे .