पनवेल दि.04 (वार्ताहर)- पनवेल मधील पिल्लई कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (पूर्वाश्रमीचे पिल्लई इन्स्टिटयूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजि) येथे कॉन्फरन्स ऑन टेक्नॉलॉजिज फॉर फ्युचर सिटीज २०२१ आयोजित करण्यात येते आहे. पिल्लई कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग हि संस्था १९९९ मध्ये डॉ. वासुदेवन पिल्लईयांनी स्थापन केली. ही संस्था एआयसीटीई मान्यता प्राप्त असून नॅक कडून A+ दर्जाची नवी मुंबई परिक्षेत्रातील एक अग्रगण्य संस्था आहे. हि संस्था मुंबई विद्यापीठाशी संलग्न आहे.
पिल्लई कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगने सद्यस्थितीला योग्य वाटेल अशा प्रकारे "टेक्नॉलॉजिज फॉर फ्युचर सिटीज" या नावाने एक परिषद शृंखला सुरु केली आहे. या शृंखलेतील पहिले पुष्प ८-९ जानेवारी २०१९ रोजी आयोजित करण्यात आले. दुसरे पुष्प ८ व ९ ऑक्टोबर २०२१ रोजी आयोजित करण्ययात येत आहे (CTFC-२०२१) भविष्यात (२०५० च्या नंतर) शहरांची जी अनिर्बंध अशी वाढ होणार आहे त्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्यांवर चर्चा घडवून आणणे हे CTFC -२०२१चे उद्दिष्ट आहे. न परवडणारी घरे, दळणवळणाची अपुरी साधने व रस्ते, आणि फारशा न उरणाऱ्या मोकळ्या जागा एकंदरीतच सार्वजनिक व्यवस्थांचे असमतोल यांचे वर्गीकरण घडवून आणणार आहेत. सर्व जगभरातून सहभागी होणारे शास्त्रज्ञ व अभियंते या परिषदेमध्ये विविध नागरी समस्यांवर तांत्रिक उपाय कसे व कोणते यावर चर्चा करतील. येऊ घातलेल्या अनेक समस्यांपैकी काही अशा सांगता येतील - अनियंत्रित वाहतूक, वाहतूक नियमांच्या पालनात शिस्त नसणे, सार्वजनिक परिवहनाचा सुमार दर्जा पर्यायाने पुरेसे वाहनतळ नसणे, पाण्याचा अपुरा पूरवठा, हवा आणि पाण्याचे प्रदूषण इत्यादी. सदर परिषदेमध्ये निमंत्रितांची भाषणे संशोधन निबंध समाविष्ट असतील. तरुण विद्यार्धी हे एक महत्त्वाचे आशास्थान आहे जे पुढे जाऊन शहराच्या अनिर्बंध अशा वाढीमुळे होणारा पृथ्वीचा ह्रास रोखण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. अशा विद्यार्थी वर्गाला ज्या कडे नवनवीन तांत्रिक कल्पना उदयाला येत असतात या परिषदेमध्ये योग्य व्यासपीठ मिळणार आहे. पिल्लई कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधील संशोधन विभागाबद्द्ल असे नक्कीच म्हणता येईल कि त्याकडे अनियोजित अशा शहरीकरणा मुळे येऊ घातलेल्या गंभीर समस्याकडे बघण्याची दूरदृष्टी आहे. भविष्यातल्या या समस्यांचे जरी पूर्णपणे निराकरण करता आले नाही. तरी झालेल्या चुका दुरुस्त करून होणारे नुकसान कमीत कमी कसे असेल हे डोळ्यासमोर ठेऊन CTFC २०२१ परिषद हे एक छोटे पण महत्त्वाचे पाऊल ठरावे.