पारगाव व डुंगी गावाचे सिडकोमार्फत पुनर्वसन होण्याकामी पाठपुरावा करणार ; पालकमंत्री आदिती तटकरे

पनवेल, दि.1 (वार्ताहर) ः नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळास लागून असलेले ग्रुप ग्रामपंचायत पारगाव हद्दीतील मौजे पारगाव व डुंगी गावास भेट देवून गावाची सविस्तर आढावा बैठक घेवून सिडकोमार्फत पुनर्वसन होण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार असे आश्‍वासन राज्यमंत्री तथा पालकमंत्री रायगड आदिती तटकरे यांची माजी आ.सुरेश लाड व बाळाराम नाईक यांनी भेट घेवून दिलेल्या निवेदनानुसार दिले आहे.
यावेळी मा.आ.सुरेश लाड, रायगड जिल्हा परिषद अध्यक्षा योगिता पारधी, पारगाव सरपंच नाईक, मा.उपसरपंच मनोज दळवी, सुहास पाटील, राहूल कांबळे, उद्योजक निलेश गायकवाड, आदींनी त्यांची भेट घेतली व त्यांच्या सोबत पारगाव पुनर्वसना संदर्भात चर्चा केली व येथील परिस्थिती सिडको मार्फत देण्यात आलेली आश्‍वासने कशा  प्रकारे हवेत विरली आहेत. तसेच पावसाळ्यामध्ये मौजे पारगाव, डुंगी परिसराचे झालेले अतोनात नुकसान आदी वेगवेगळ्या विषयांसंदर्भात त्यांच्याशी चर्चा करून त्यांना या भागात भेट देवून येथील ग्रामस्थांचे म्हणणे ऐकून त्यांना योग्य न्याय मिळवून द्यावा अशी मागणी केली असता लवकरच या संदर्भात या ठिकाणी भेट देवून येथील परिस्थितीची पाहणी करून सिडकोकडे पाठपुरावा करू, असे आश्‍वासन त्यांनी दिले आहे.

Comments