खारघर मधील खराब रस्त्यांच्या दुरुस्तीकरता व इतर समस्यांकरीता युवासेना आक्रमक ...

पनवेल / वार्ताहर : - आज खारघर शहरातील प्रमुख समस्या असलेल्या खराब रस्ते व प्रत्येक चौकात व मार्गावर पडलेल्या खड्डयांमुळे खारघर खड्डेघर बनले आहे व याचा दैनंदिन त्रास सर्वसामान्य वाहनचालकांना सहन करावा लागत आहे तसेच पावसात दुचाकी स्वारांना अपघातास सामोरे जावे लागत असल्याने नागरीकांमध्ये प्रशासनाविरुद्ध तीव्र नाराजी पसरली आहे.
तसेच रस्त्यालगत दुतर्फा असलेल्या वृक्षांच्या वाढलेल्या फांद्याचा त्रास वाहनांना होत आहे त्यांची छाटणी होणे गरजेची आहे.
व सततच्या होणार्या पावसामुळे शहरात विविध ठिकाणी ड्रेनेज लाइन जाम झाल्यामुळे विविध ठिकाणी पाणी साचत आहे तसेच सांडपाणी व घाणपानी रस्त्यांवर येऊन त्याची दुर्गंधी पसरत आहे.
या सर्व समस्यांवर त्वरीत कार्यवाही करुन सर्वसामान्य नागरीकांच्या समस्या सोडव्यावात याकरीता सिडकोचे कार्यकारी अभियंता  तात्याराव अहीरे यांची भेट घेवून नागरिकांच्या समस्या मांडल्या व तातडीने कामे मार्गी लावावे अशी विनंती करण्यात आली आहे.

यावेळी युवासेना पदाधिकारी अवचित राऊत युवासेना उपजिल्हा अधिकारी , अनिकेत पाटील उपविधानसभा अधिकारी  , विनोद पाटील खारघर शहर अधिकारी , मिथुन पाटील शहर चिटणीस , प्रेम ठाकुर विभाग अधिकारी , निखील पानमंद , अजय कदम , संतोष शिंदे , सागर जाधव , योगेश महाले ,सुधीर शिंदे , विजय रोकडे , समीर वर्गट , अश्वीन ससाने , सुदर्शन खंडागळे , आदी युवासैनिक उपस्थित होते.
Comments