अ‍ॅड.शुभांगी केदार लाड नवदुर्गा पुरस्कारने सन्मानित.....
अ‍ॅड.शुभांगी केदार लाड नवदुर्गा पुरस्कारने सन्मानित....
पनवेल, दि.13 (वार्ताहर) ः क्षितीज पर्व स्नेहकुंज आधारगृह संगीत एकता सांस्कृतिक कला व सामाजिक संस्था जनाधर्मा आधारगृह व द्वारकादास श्यामकुमार यांच्या संयुक्त विद्यमाने सन्मान नवदुर्गा पुरस्कार 2021 ने अ‍ॅड.शुभांगी केदार लाड यांना प्रशस्तीपत्र व पैठणी साडी देवून सन्मानित करण्यात आले आहे.
पनवेल परिसरातील अशा नवदुर्गांना या संस्थेच्या माध्यमातून सन्मान कर्तृत्वाचा, सन्मान प्रेरणादायी व्यक्तीमत्वाचा, सन्मान अनमोल रत्नाचा, सन्मान तीच्या अस्तित्वाचा अशा प्रकाराने गौरविण्यात आले आहे. त्यामध्ये स्नेहकुंज आधारगृहाच्या संचालिका संगीता नितीन जोशी, जनाधर्मा आधारगृह सहसचिव दिपाली पारसकर, क्षितीज पर्वचे संपादक सनीप कलोते यांनी अ‍ॅड.शुभांगी केदार लाड यांनी आतापर्यंत माता भगिनींना न्याय देण्याच्या माध्यमातून केलेले कार्य लक्षात घेवून त्यांचा विशेष सन्मान केला. 

Comments