स्थानिक प्रकल्पग्रस्थ खांदेश्वर रिक्षा चालक मालक संघटनेच्या रिक्षा चालकांनची मोफत आरोग्य तपासणी....
स्थानिक प्रकल्पग्रस्थ खांदेश्वर रिक्षा चालक मालक संघटनेच्या रिक्षा चालकांनची मोफत आरोग्य तपासणी ....
 
पनवेल /प्रतिनिधी: स्थानिक प्रकल्पग्रस्थ खांदेश्वर रिक्षा चालक मालक संघटना व आय ट्रेन्ड ऑपटीक्स, साई दृष्टी हॉस्पिटल, स्पार्क केयर यांच्या संयुक्त विदयमाने रिक्षा चालकांनसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीर राबविण्यात आले. 
   
या आरोग्य तपासणी शिबीर मध्ये नेत्र चिकित्सा, बी.पी.रक्तदाब, डायबेटीज नाडी परिक्षण, बी एम आय बाॅडीफॅट, प्रकृती परिक्षण व भोजन सल्ला. हे सगळे तपासण्यात आले. 
         या आरोग्य तपासणी शिबीरा मध्ये 100 ते 150 रिक्षा चालकांनी आपली आरोग्य तपासणी करून घेतली. 
            तसेच आरोग्य तपासणी शिबीरासाठी  आय ट्रेन्ड ऑपटीक्स तर्फे (निलेश मसुरकर व सहकारी. तसेच स्पार्क लाईफ केयर तर्फे. डाॅ. सुनिल बारगे व सहकारी डॉक्टर आणि साई दृष्टी आय हॉस्पिटल तर्फे डाॅ. राजपाल उसनाले  व सहकारी डाॅक्टर यांची मोलाची साथ मिळाली.
रिक्षा चालकांच्या आरोग्य तपासणी शिबीर साठी प्रमुख पाहुणे म्हणून पनवेल महानगरपालिकेच्या नगरसेविका हेमलता म्हात्रे तसेच पनवेल महानगरपालिकेच्या नगरसेविका सारिका भगत या उपस्थित होत्या. खांदेश्वर रिक्षा चालक मालक संघटनेचे युनियन अध्यक्ष मच्छिंद्र पाटील यांनी डॅक्टर व नगरसेविका यांचे मनःपूर्वक आभार मानले.
Comments