पनवेल तालुका पोलीस ठाण्यातर्फे जप्त मुद्देमालाचा होणार लिलाव...
पनवेल, दि.१ (वार्ताहर) ः पनवेल तालुका पोलीस ठाण्याने गुन्ह्यातील हस्तगत मुद्देमालाचा लिलाव होणार असल्याचे जाहीर केले आहे. तालुका पोलीस ठाणे गुन्हा रजि.नं. 138/2021, भा.दं.वि. कलम 406, 34 सह अत्यावश्यक वस्तू कायदा 1955चे कलम 3,7,8 सह लुब्रिकन्टस ऑईल अॅण्ड ग्रीसेस (प्रोसेसिंग, सप्लाय अॅण्ड डिस्ट्रीब्यूशन रेग्युलेशन) ऑर्डर 1987 प्रमाणे या गुन्ह्यातील 73 टन हायड्रोकार्बन ऑईल (डिझेल) हे हस्तगत करण्यात आले होते.
हस्तगत केलेल्या मुद्देमालाचे वेगवेगळे नमुने घेऊन ते तपासणीसाठी न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा (कलिना, मुंबई) यांच्याकडे पाठवण्यात आले होते. तपासणीनंतर त्यांच्याकडील तपासणी अहवाल प्राप्त झालेला असून, त्यामध्ये सर्व मुद्देमाल हायड्रोकार्बन ऑईल नसून डिझेल असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. डिझेल हे अत्यावश्यक वस्तू अंतर्गत येत असल्याने हा हस्तगत गुद्देमाल शासनजमा होण्याकरिता रायगड जिल्हाधिकार्यांना अहवाल सादर करण्यात आला. त्यानुसार नमूद संदर्भान्वये त्यांच्याकडे हस्तगत मुद्देमालाचा लिलाव करून लिलावात प्राप्त झालेली रक्कम शासनजमा करण्याबाबत आदेशित केले आहे.
या अनुषंगाने गुन्ह्यातील हस्तगत मुद्देमालाचा लिलाव करणे आवश्यक असल्याने अधिकृत खरेदी व विक्री करणारे ठेकेदार यांनी याबाबत अधिक माहितीसाठी पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक रवींद्र दौंडकर (9821662649), तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पगार (8888756777), पोलीस हवालदार व्ही. के. निवळे (9082125141) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.