14 हजाराची रोख रक्कम लंपास....
14 हजाराची रोख रक्कम केेली लंपास....

पनवेल, दि.16 (वार्ताहर) ः 14 हजाराची रोख रक्कम कपाटातील लॉक कशानेे तरी तोडून लंपास केल्याची घटना तालुक्यातील डेरवली येथील बिनटेक्स सोल्युशन कंपनीच्या गोडावूनमध्ये घडली आहे.
अलियास तैफिक अन्सारी (28) याने त्याच्या पगारात आलेले 14 हजार रुपये रोख रक्कम बॅगेमध्ये ठेवून सदर बॅग त्यांच्या सोबत राहणारे मनोज पटेल यांच्या कपाटात ठेवून तो कामानिमित्त मुंबई येथे गेला होता. यावेळी त्याच्या रुममध्ये राहणारा सहकारी मंगेश पाटील (23) याने मनोज पटेल याच्या कपाटाचे लॉक कशाने तरी तोडून त्यात ठेवलेली 14 हजाराची रोख रक्कम लंपास केल्याने याबाबची तक्रार पनवेल तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
Comments