सदाशिव साठे यांचे निधन ..

सदाशिव साठे यांचे दुःखद निधन...

पनवेल (प्रतिनिधी) : -  गुळसुंदे येथील ज्येष्ठ नागरिक सदाशिव शंकर साठे उर्फ अण्णा यांचे (गुरुवार, दि. ०२ सप्टेंबर) वयाच्या ७५ व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले.  त्यांच्या पश्चात पत्नी सखुबाई, मुलगा राजेश, संतोष, सतिश, सुना, नातवंडे, एक भाऊ, दोन बहिणी असा परिवार आहे. 
        सदाशिव साठे यांच्या पार्थिवावर गुळसुंदे येथील स्मशानभूमीत कोरोनाचे नियम पाळून  अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवर आणि नातेवाईक, ग्रामस्थ उपस्थित होते. सदाशिव साठे यांचा प्रेमळ व हसतमुख स्वभाव होता. तसेच ते अण्णा या नावाने सुपरिचित होते. त्यांचा दशक्रिया विधी शनिवार दिनांक ११ सप्टेंबरला गुळसुंदे श्रीक्षेत्र येथे तर उत्तरकार्य रहात्या घरी मंगळवार दिनांक १४ सप्टेंबर रोजी होणार आहे.
Comments