हौशी,व्यावसायिक व पालिका कर्मचारी छायाचित्रकारांसाठी महापालिकेतर्फे छायाचित्रण स्पर्धेचे आयोजन...
पनेवल,दि. २८ : पनवेल महानगरपालिकेच्या पाचव्या वर्धापनदिनानिमित्त ‘रंग पनवेलचे’ या संकल्पने अंतर्गत मुंबईचे महाद्वार पनवेल, बदलतं पनेवल माझं पनवेल, मायानगरीचे महाद्वार आमचं पनेवल या विषयांवर हौशी ,व्यवसायिक व  पालिका कर्मचारी  छायाचित्रकारांसाठी महापालिकेने छायाचित्रण स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. पनवेल महापालिका कार्यक्षेत्रातील हौशी व व्यवसायिक छायाचित्रकारांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन महापौर डॉ.कविता किशोर चौतमोल आणि  आयुक्त गणेश देशमुख यांनी केले आहे.
या स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी 8928931032 या व्हॉटसृ क्रमांकावरती आपली नावे नोंदवून 05 ऑक्टोबरपर्यत आपली छायाचित्रे पनवेल महानगरपालिकेच्या जनसंपर्क विभागामध्ये जमा करावीत.
प्रत्येक गटातील 5 विजेते घोषित करण्यात येणार आहेत. या स्पर्धेतील विजेत्यांना प्रत्येकी रूपये पाच हजाराचे बक्षीस देण्यात येणार आहे.

स्पर्धेचे नियम वअटी :

1.व्यावसायिक छायाचित्रकारांनी आपले नाव नोंदविताना आपण व्यावसायिक असल्याचे ओळखपत्र किंवा संबधित संस्थेचे पत्र पाठवणे आवश्यक आहे. असे ओळखपत्र किंवा संस्थेचे पत्र नसल्यास अशा स्पर्धकांचा समावेश हौशी गटात करण्यात येईल.

2. या स्पर्धेत पनवेल महानगरपालिका कार्यक्षेत्रातील हौशी गटात लोकप्रतिनिधी,विविध समितीवरील सदस्य,अधिकारी, पालिका कर्मचारी,नागरिक सहभागी होऊ शकतात.

3. स्पर्धकांनी आपल्या अर्जासोबत 08 x 12 इंच आकारातील रंगीत छायाचित्रांची प्रत्येकी एक फोटोप्रिंट पाठवावी.छायाचित्रे शक्यतो आडवी असावी,छायाचित्रे लॅमिलेशन केलेली नसावीत. या छायाचित्रांसोबत  त्याची मूळ सॉफ्ट कॉपी सीडी पाठविणे आवश्यक आहे. या सॉफ्ट कॉपीतील फोटो्ज हे कमीत कमी ३०० डीपीआय इतके असावे. छायाचित्रे

  4. स्पर्धकांनी छायाचित्रे पाठविताना छायाचित्रांच्या मागील बाजूस आपले नाव, मो.नं,छायाचित्रणाचे स्थळ नमूद करावे. हे नमूद करताना मार्कर पेनने लिहणे गरजेचे आहे. किंवा चिठ्ठीवर लिहून चिकटवावे. मात्र ही चिठ्ठी चिकटवताना मागील छायाचत्र खराब होणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे. स्वत:ची ओळख पटेल अशी कोणतीही खूण त्यावर करू नये.असे आढळल्यास असे छायाचित्रकारास स्पधेतून बाद करण्यात येईल. 

5. स्पर्धकांनी त्यांचे नाव, मो.नं पत्ता , हौशी गट,पालिका कर्मचारी किंवा व्यवसयिक गट याचा स्पष्ट उल्लेख करणे आवश्यक आहे. अर्धवट माहिती असणाऱ्या स्पर्धकांची छायाचित्रे ग्राह्य धरली जाणार नाहीत.

6.स्पर्धकांनी आपल्या छायाचित्र ही नैसर्गिक असावीत, त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे तांत्रिक फेरबदल अथवा कलाकुसर केलेली नसावी.

7. स्पर्धेत कोणत्याही स्वरूपाचे अंशत: किंवा पूर्णत: बदल करण्याचे संपूर्ण अधिकार महापालिकेस असेल.

8. स्पर्धकांनी आपली छायाचित्रे 05ऑक्टोबर पर्यंत पाठवाणे बंधनकारक राहील यानंतर आलेल्या छायाचित्रे स्पर्धेमध्ये ग्राह्य धरण्यात येणार नाही.

9. स्पर्धेतील छायाचित्रांवर महापालिकेचे हक्क राहणार आहे. प्राप्त् छायाचित्रे ही पनेवल महानगरपालिकेची मालमत्ता असेल भविष्यात त्याचा योग्य् वापर करण्याचा अधिकार पूर्णत: पनवेल महापालिकेचा असेल.

10. परिक्षकांचा निर्णय अंतिम राहिल.

11. सौंदर्य मूल्यांची जपवणूक करत महानगरपालिकेचे प्रकल्प, उपक्रम यांचा समावेश असणारी छायाचित्रे असल्यास प्राधान्य.
Comments
Popular posts
दिशा महिला मंच तर्फे नवी मुंबईतील कर्तृत्ववान महिलांना "नवदुर्गा पुरस्कार" देऊन सन्मान...
Image
महाराष्ट्र पोलीसांचा सातासमुद्रापार झेंडा ; सहाय्यक पो.नि. सुभाष पुजारी यांनी जागतिक शरीरसौष्ठव स्पर्धेत पटकाविले ब्रॉन्झ मेडल....
Image
बाळासाहेब ठाकरे लॉ कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे मुंबई हायकोर्टात "ती" नावाचे पथनाट्य सादर....
Image
खांदा कॉलनी युवासेने तर्फे जेष्ठ नागरिकांना मोफत चष्मे वाटप व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न....
Image
शिवसेनेच्या कार्यप्रणालीवर प्रेरित होऊन खारघर मधील शेकडो महिला व पुरुषांचा सेनेत जाहीर पक्ष प्रवेश ....
Image